दिलासादायक ! ‘कोरोना’ रूग्णांच्या ‘स्वस्त’ उपचारासाठी महाराष्ट्र, गुजरात आणि UP चा खासगी क्षेत्राशी ‘करार’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, कोविड-19 च्या रूग्णांना योग्य आरोग्य उपचार उपलब्ध करण्याच्या प्रयत्नांतर्गत उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगना आणि महाराष्ट्रासारख्या राज्यांनी खासगी क्षेत्राशी करार केला आहे.

पायाभूत सुविधांची कमतरता लक्षात घेऊन खासगी क्षेत्राशी चर्चा

आरोग्याच्या पायाभूत सुविधांची कमतरता लक्षात घेऊन आरोग्य मंत्रालयाने सोमवारी राज्य आणि केंद्रशासीत प्रदेशांकडून बेडची उपलब्धता आणि क्रिटीकल केयर आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी आणि सेवांसाठी योग्य पारदर्शक शुल्क ठरवण्यासाठी खासगी क्षेत्राशी चर्चा करण्यास सांगितले आहे.

मंत्रालयाने सांगितले की तमिळनाडु, ओडिसा, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, तेलंगना, कर्नाटक आणि मध्य प्रदेशात याची सुरूवात करण्यात आली आहे. त्यांनी अगोदरच खासगी क्षेत्राशी याबाबत चर्चा करून करार केला आहे. राज्यांना सार्वजनिक आणि खासगी क्षेत्राच्या आरोग्य सुविधांच्या पूलिंगवर विचार करण्यासही सांगण्यात आले आहे, यामुळे कोविड-19 रूग्णांना तात्काळ, चांगली गुणवत्ता आणि योग्य देखभाल मिळू शकते.

मंत्रालयने सांगितले की, कोविड-19 चे निदान करण्यासाठी टेस्ट क्षमता सतत वाढवली जात आहे. आता ही क्षमता तीन लाख सॅम्पल प्रतिदिनवर पोहचली आहे. सध्या देशात 907 लॅबचे नेटवर्क आहे, ज्यामध्ये 659 लॅब सरकारी आणि 248 लॅब खासगी क्षेत्रातील आहेत. कोविड-19 च्या डायग्नोसिससाठी आरटी-पीसीआर टेस्ट गोल्ड स्टँडर्ड फ्रंटलाईन टेस्ट आहे. दुर्गम भागात ट्रूनेट आणि सीबी एनएएटीचा वापर करता येईल आणि केला जात आहे. आतापर्यंत कोविड-19 साठी 59,21,069 सॅम्पलची टेस्ट केली गेली आहे. मागील 24 तासात 1,54,935 सॅम्पल टेस्ट करण्यात आले आहेत.

दिल्लीत टेस्टींग क्षमता वाढवण्यासाठी आता सर्व 11 जिल्ह्यांत लॅब दिली गेली आहे. सध्या दिल्लीत एकुण 42 लॅब आहेत. त्यांची टेस्ट क्षमता सुमारे 17 हजार प्रतिदिन आहे.