Coronavirus : दिलासादायक ! गोव्यानंतर मणिपूर देखील जीवघेण्या ‘कोरोना’ व्हायरसपासून मुक्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी सोमवारी आनंद व्यक्त करत सांगितले की, कोरोना विषाणूच्या कचाट्यातून राज्य मुक्त झाले आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी यासंदर्भात घोषणा केली. रविवारी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही दावा केला की, राज्यात एकही कोरोना रुग्ण नाही. त्याचबरोबर त्यांनी राज्यातील जनतेला आवाहन केले की, तुम्ही सर्वांनी ज्या प्रकारे प्रशासनाला साथ दिली त्याप्रमाणे 3 मे पर्यंत तसे सहकार्य केले पाहिजे.

मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी लिहिले की, ‘कोविड – 19 मधून मणिपूर मुक्त झाले हे सांगून मला आनंद होत आहे. या विषाणूची लागण झालेले दोन्ही रूग्ण पूर्णपणे निरोगी झाले आहेत आणि त्यांची चाचणी नकारात्मक झाली आहे. राज्यात आता कोणतेही नवीन प्रकरण नाही. तसेच राज्यातील सार्वजनिक आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानेच हे शक्य झाले आहे. लॉकडाऊनच्या कडक नियमांचे जनतेने पालन केले व प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले.

मार्चअखेर ब्रिटनहून मणिपूरला परतलेल्या 23 वर्षीय महिलेची कोरोना व्हायरस टेस्ट पॉझिटिव्ह. या महिलेवर इंफाळ येथील जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (जेएनआयएमएस) येथे उपचार करण्यात आले. तिची तब्येत सुधारल्यानंतर तिला घरी पाठविण्यात आले आहे. ती इंफाळ पश्चिममधील थांगमेबंदची आहे. यापूर्वी देशातील ईशान्य भाग या साथीच्या आजारापासून वाचला होता. मणिपूरमध्ये लॉकडाऊन सुरू आहे. दरम्यान, केवळ सर्वात आवश्यक सेवांना लॉक-डाउनमधून सूट देण्यात आली आहे.

रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (रिम) आणि जेएनआयएमएस या दोन रुग्णालयांमध्ये सरकारने आयसोलेशन वॉर्ड सुरू केले. या व्यतिरिक्त राज्य सरकारने देखील लोकांना होम क्वारेन्टाईन ऑर्डरचे पालन करावे व कोणतीही लक्षणे लपवू नयेत असे आवाहन केले होते आणि राज्यातील जनतेने त्यास पूर्ण पाठिंबा दर्शविला. दरम्यान, देशातील उत्तर-पूर्व राज्य सिक्कीममध्ये आतपर्यंत हे संक्रमण पोहोचले नाही. आरोग्य मंत्रालयाच्या मते सोमवारी सकाळी 10.45 पर्यंत संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 14,175 वर गेली. यापैकी 2546 लोक स्वस्थ झाले आहेत तर 543 लोकांचा मृत्यू झाला आहे.