ताज्या बातम्याराष्ट्रीय

RTI : भारताने ‘या’ तारखेपासून एकही व्हॅक्सीन परदेशात पाठवली नाही; ‘कोविशील्ड’ 200 तर ‘कोव्हॅक्सीन’ 295 रुपयाला केली खरेदी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – माहितीच्या अधिकारांतर्गत (RTI) मागितलेल्या माहितीत केंद्र सरकारने सोमवारी सांगितले की, 5 मे पासून कोरोना प्रतिबंधक व्हॅक्सीनची निर्यात आणि मदतीच्या रूपात परदेशात पाठवण्यावर पूर्णपणे बंद आहे. पुणे येथील कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांच्या प्रश्नाच्या उत्तरात परराष्ट्र मंत्रालयाने या माहितीसह पाच मे पर्यंत 95 देशांना विविध श्रेणीत निर्यात केलेल्या लसींची माहिती सुद्धा दिली आहे.

एका प्रश्नाच्या उत्तरात परराष्ट्र मंत्रालयाने हे सुद्धा स्पष्ट केले आहे की, भविष्यात, स्थानिक उत्पादने आणि राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाची आवश्यकता लक्षात घेऊन दुसर्‍या देशांना निर्यात सुरू केली जाईल.

विशेष म्हणजे जगभरात भारताने व्हॅक्सीन पाठवल्याने देशात लसीचे संकट निर्माण झाल्याने मोठा गोंधळ झाला होता. या मुद्द्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, आम आदमी पार्टी, वाम आणि इतर विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पाटीच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती.

सारडा यांनी म्हटले की, मूलभूत निर्यात आकडे सोडून सरकारने अनेक इतर संबंधीत आकड्यांवर मौन धरले आहे. उदाहरणार्थ, केंद्राने म्हटले आहे की, लसीच्या निर्यातीवर निर्णय घेण्यासाठी जर कोणत्या प्रकारची समिती बनवली होती तर त्यांच्याकडे समितीचे सदस्य, बैठकांची माहिती नाही. हे खुपच रहस्यमय आहे. कोणत्या मंत्रालयाने प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात लस दान किंवा निर्यात करण्याचा निर्णय घेतला, विशेषकरून तेव्हा जेव्हा कमीतकमी दोन प्रमुख मंत्रालये, आरोग्य आणि परदेश मंत्रालये, या प्रक्रियेमध्ये थेट सहभागी होऊ शकत होती.

उत्तरात सांगण्यात आले की, निर्यात आणि अनुदानात देण्यासाठी लस, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या परवानगीने थेट कंपन्यांकडून खरेदी केली. मात्र, उत्तरात हे सांगितले नाही की, इतका महत्वाचा निर्णय कुणाच्या आदेशावर घेतला गेला, विशेष करून तेव्हा जेव्हा देश कोरोनाने वाईट प्रकारे पीडित होता.

सारडा यांच्या अधिकृत आकड्यांनुसार, केंद्राने 47 देशांना अनुदानाच्या रूपात 107.15 लाख डोस मोफत दिले. 26 देशांना व्यावसायिक दराने 357.92 लाख डोस दिले गेले. कोव्हॅक्स कार्यक्रमांतर्गत इतर 47 देशांना 198.63 लाख डोस विकण्यात आले. एकुण 6.637 कोटी डोस दुसर्‍या देशातना दिले गेले.

उत्तरानुसार, केंद्राने पुण्याची कंपनी सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाकडून कोविशील्डचा एक डोस 200 रुपये प्लस जीएसटी आणि भारत बायोटेककडून कोव्हॅक्सीन 295 रुपये प्लस जीएसटीच्या हिशेबाने खरेदी केले होते. 31 मे (सोमवार) पर्यंत, भारताने विविध स्वीकृत श्रेणींच्या अंतर्गत एकुण 21,31,54,129 लोकांना लस दिली आहे, ज्यामध्ये त्यांच्या दुसर्‍या डोसचा सुद्धा समावेश आहे.

Gold Price Today : सोन्यामध्ये वाढ तर चांदीत घसरण, जाणून घ्या आजचे भाव

गुन्हा दाखल होताच आमदार महेश लांडगेंनी मुलीचा विवाह माऊलींच्या ‘साक्षी’ने उरकला

Pune : जमीन खरेदी केल्यानंतर रक्कम देण्यास टाळाटाळ; वाकड चौकातील अमित कलाटेला अटक, न्यायालयानं पोलिस कोठडी सुनावली

Pune : पुण्यात दुपारी 3 ते सकाळी 7 वाजेपर्यंत कडक संचारबंदी ! उद्याने, मॉल्स, थिएटर, जीम अशी गर्दीची ठिकाणे बंदच राहाणार; जाणून घ्या सविस्तर