WhatsApp ला गुलाबी रंगात बदलण्याचा दावा करणाऱ्या ‘मेसेज’मध्ये Virus, ‘हॅक’ होऊ शकतो तुमचा फोन, जाणून घ्या बचावाचे उपाय

नवी दिल्ली : वृत्त संस्था –  सायबर तज्ज्ञांनी लिंकद्वारे फोनवर पाठवण्यात येत असलेल्या व्हायरसबाबत सावध केले आहे. या लिंकमध्ये दावा करण्यात येतो की, व्हॉट्सअप गुलाबी रंगाचे होईल आणि नवीन वैशिष्ट्यांचा समावेश होईल.

सायबर सुरक्षा तज्ज्ञांनुसार, लिंकमध्ये दावा करण्यात येतो की, ती व्हॉट्सअपकडून अधिकृत अपडेटसाठी आहे, परंतु लिंकवर क्लिक करताच संबंधित वापरकर्त्याचा फोन हॅक होईल आणि तो व्हॉट्सअपचा वापर करू शकणार नाही.

व्हॉट्सअप पिंक नावाने लिंक, क्लिक करू नका
सायबर सुरक्षा तज्ज्ञ राजशेखर राजहरिया यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे, व्हॉट्सअप पिंकबाबत सवाधान! एपीके डाऊनलोड लिंकसह व्हॉट्सअप ग्रुप व्हायरस पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. व्हॉट्सअप पिंकच्या नावाच्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. लिंकल क्लिक केल्यानंतर फोनचा वापर करणे अवघड होईल.

सायबर सुरक्षेशी संबंधीत कंपनी वोयागेर इन्फोसेकचे संचालक जितेन जैन यांनी म्हटले की, वापरकर्त्यांना सल्ला दिला जात आहे की, त्यांनी गुगल किंवा अ‍ॅप्पलच्या अधिकृत अ‍ॅप स्टोअरशिवाय एपीके किंवा अन्य मोबाइल अ‍ॅप इन्स्टॉल करू नये.

याबाबत संपर्क केल्यानंतर व्हॉट्सअपने म्हटले, जर एखाद्याला संशयास्पद मेसेज किंवा ई-मेलसह काही मेसेज आला तर त्यास उत्तर देण्यापूर्वी संपूर्ण तपासून घ्या आणि सतर्क रहा. व्हॉट्सअपवर आम्ही सल्ला देतो की, आम्ही ज्या सुविधा दिल्या आहेत, त्यांचा वापर करा, आम्हाला रिपोर्ट पाठवा, संपर्काबाबत माहिती द्या किंवा त्यास ब्लॉक करा.