केंद्रीय जल आयोगाने देशातील अनेक भागात अचानक आलेल्या पुराबाबत दिला ‘इशारा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय जल आयोगाने विविध भागांमध्ये आलेल्या पुराबाबत इशारा दिला आहे. गुजरात, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि किनारी कर्नाटक उपविभागातील काही भागांना जास्त धोका आहे. केंद्रीय जल आयोगाने अधिकृत पुराचा अंदाज वर्तवला आहे.

मुंबईच्या काही भागात मुसळधार पाऊस
बुधवारी मुंबईत काही भागात मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याने भरले. यामुळे ये-जा करणाऱ्या लोकांना आणि वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागला. गेल्या १२ तासांत शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. १५० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडणाऱ्या पश्चिम उपनगरात पावसाचा जास्त परिणाम झाला. पुढील २४ तासांत कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज केंद्रीय जल आयोगाने वर्तवला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या आसपासच्या भागातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारी संध्याकाळपासून मुंबईसह संपूर्ण कोकणात मुसळधार पावसात सात जण ठार झाल्याची माहिती मिळत आहे. मुंबईच्या कांदिवली परिसरातील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर दरड कोसळल्याने वाहतूक एकदम ठप्प झाली. यामुळे दक्षिण मुंबईकडे ये-जा करणाऱ्या वाहनांना ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरुन जावे लागले.

पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
लक्षात घ्या कि अरबी समुद्रावर सक्रिय मान्सूनमुळे सोमवारी मुंबईत मुसळधार पावसाची नोंद झाली होती. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) पुढील दोन दिवस मुंबई व त्याच्या उपनगर भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला. ४ ते ५ ऑगस्ट रोजी महानगर व महाराष्ट्रात इतर ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असे एजन्सींचे म्हणणे आहे. बीएमसीने मुंबईकरांना घरी राहण्याचा सल्ला दिला आहे.

शहरातून बाहेर जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक बदलले
मुसळधार पावसामुळे नेहमीप्रमाणे मुंबईतील किंग्ज सर्कल, सायन, हिंदमाता, दादर, पोस्टल कॉलनी, अंधेरी आणि मलाड सबवे, जोगेश्वरी आणि दहिसर इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले. यामुळे उपनगरातील बसेस आणि लोकल गाड्यांच्या सेवांवर मोठा परिणाम झाला आहे. पश्चिम रेल्वे तर काही काळ बंदच आहे. मुंबईहून बाहेर जाणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रकदेखील बदलावे लागले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like