ताजमहाल-लाल किल्ल्यासह देशातील सर्व स्मारके 6 जुलैपासून उघडू शकतात, अटींसह…!

नवी दिल्ली : वृत्त संस्था – केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांनी म्हटले आहे की, कोरोना व्हायरस संसर्गामुळे बंद करण्यात आलेली देशातील सर्व स्मारके येत्या 6 जुलैपासून उघडली जाऊ शकतात. ही स्मारके सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करून उघडण्यात येतील. पुरातत्व विभाग आणि संस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी लालकिल्ला, ताजमहालसह अनेक स्मारकं उघडली जाऊ शकतात.

भारतात कोरोना व्हायरसचा वाढता प्रकोप रोखण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने 3400 पेक्षा जास्त स्मारके बंद केली होती, परंतु नंतर एएसआय अंतर्गत 820 धार्मिकस्थळे उघडण्यात आली होती. आता 6 जुलैपासून उर्वरित स्मारके उघडण्याबाबत विचार सुरू आहे. मात्र, हे सुद्धा म्हटले जात आहे की, राज्य सरकार कोरोनाच्या केस पाहून निर्णय घेऊ शकतात की, त्यांना स्मारके उघडायची आहेत किंवा नाही. जर राज्यांना सुरक्षेच्या दृष्टीने स्मारके उघडण्यात अडचण वाटत असेल तर ते, ती बंद ठेवू शकतात.

दिल्ली आणि उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये कोरोना संसर्गाची प्रकरणे सतत वाढत आहेत. येथे प्रत्येक दिवशी विक्रमी प्रकरणे नोंदली जात आहेत. अशा स्थितीत राज्य सरकारे स्मारके उघडण्याची जोखीम घेण्याची शक्यता कमी दिसत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सतत लोकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देत आहेत. तरीही एक्सपर्टचे म्हणणे आहे की, येत्या महिन्यात स्थिती आणखी गंभीर होऊ शकते. अशात स्मारके खोलणे योग्य ठरणार नाही.

1 जुलैपासून अनलॉक-2 लागू झाला आहे, या अंतर्गत देशात आर्थिक हालचाली पुन्हा सुरू केल्या जात आहेत. याच अंतर्गत 6 जुलैपासून ही पर्यटनस्थळे आणि स्मारके उघडण्याचा निर्णय घेतला जात आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like