Coronavirus India News : देशाच्या मोठ्या लोकसंख्येला अजूनही कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका : आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसवर केंद्रीय आरोग्य मंत्रालय, आयसीएमआर आणि नीती आयोगाने मंगळवारी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, सीरो सर्वेच्या दुसर्‍या रिपोर्टनुसार देशातील एका मोठ्या लोकसंख्येला अजूनही कोरोना व्हायरसच्या संसार्गाचा धोका होऊ शकतो. आयसीएमआरचे संचालक बलराम भार्गव यांनी सांगितले की, आयसीएमआरच्या दुसर्‍या सीरो रिपोर्टनुसार, ऑगस्ट 2020 पर्यंत 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक 15 व्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झालेला आहे.

आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी म्हटले की, भारतात कोरोना व्हायरसच्या संसर्गातून 51 लाखांपेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत 7 कोटी 30 लाखांपेक्षा जास्त टेस्ट झाल्या आहेत. मागील आठवड्यात 77.8 टेस्ट करण्यात आल्या. प्रति 10 लाखांच्या लोकसंख्येत भारतात 4453 कोरोनाची प्रकरणे आहेत.

नव्या प्रकरणांच्या बाबतीत भारतात प्रति 10 लाखांच्या लोकसंख्येवर 425 प्रकरणे आहेत. कोरोनामुळे प्रति 10 लाखांच्या लोकसंख्येत 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. सप्टेंबर महिन्यात 2 कोटी 97 लाख टेस्ट झाल्या आहेत, ऑगस्टमध्ये हा आकडा 2 कोटी 39 लाख होता.

आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी म्हटले की, देशात एकुण कोरोनाच्या प्रकरणांमध्ये 15.4 टक्केच प्रकरणे सक्रिय आहेत, तर रिकव्हरी प्रकरणे एकुण केसच्या 83 टक्के आहेत. आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांचे म्हणणे आहे की, पहिला सीरो सर्वे 11 मे ते 4 जूनच्या दरम्यान झाला होता. हा 21 राज्यांच्या 70 जिल्ह्यात करण्यात आला होता. त्यावेळी 0.73 टक्के संक्रमण दर आढळला. दूसरा सीरो सर्वे 17 ऑगस्टपासून 22 सप्टेंबरदरम्यान झाला होता. 21 राज्यांच्या 70 जिल्ह्यात हा सर्वे झाला.

दुसर्‍या सीरो सर्वेत 10 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये कोरोनाचा प्रसार 6.6 टक्के आढळला. शहरी स्लममध्ये 15.6 टक्के, स्लम नसलेल्या परिसरात 8.2 टक्के प्रसार आढळला. तर ग्रामीण स्लम भागात 4.4 टक्के प्रसार आढळला. या सीरो सर्वेतून समजते की, देशाच्या मोठ्या लोकसंख्येवर अजूनही कोरोनाने संक्रमित होण्याचा धोका आहे. 5 टी (टेस्ट, ट्रॅक, ट्रेस, ट्रीट आणि टेक्नॉलजी) चे धोरण अवलंबण्याची गरज आहे. त्यांनी म्हटले की, आगामी सण, हिवाळा आणि गर्दी पाहता राज्यांनी कंटेन्मेट रणनिती लागू करण्याची आवश्यकता आहे.

आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले की, पहिल्या सीरो सर्वेत देशाच्या 7.3 टक्के लोकसंख्येत कोरोना संसर्गाचा अंदाज होता, आता तो 7.1 टक्के आहे. दिल्लीत दुसर्‍या टप्प्याच्या सीरो सर्वेत 29.1 टक्के कोरोनाचा प्रसार आढळला, पहिल्या सर्वेत हा आकडा 23.5 टक्के होता.

निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के.पॉल यांनी म्हटले की, आपल्या सर्वांना हे ठरवण्याची आवश्यकता आहे की, आगामी महिन्यांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी मास्कवाली पूजा, मास्कवाली छठ, मुखवट्याची दिवाळी, मास्कवाला दसरा, मास्कवाली ईद साजरी केली पाहिजे.

कोरोना वॅक्सीनसाठी 80,000 कोटी रुपयांचे बजेट
आरोग्य मंत्रालयाने म्हटले की, सरकारने कोरोना वॅक्सीनसाठी 80,000 कोटी रुपयांचे बजेट केले आहे. 80 हजार कोटी रुपयांची आवश्यकता भासेल किंवा नाही हे अजून स्पष्ट नाही. भारत सरकारने वॅक्सीनबाबत डॉ. पॉल यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी बनवली आहे.

यामध्ये वॅक्सीनबाबत लोकांना प्राथमिकता देण्याबाबत चर्चा झाली आहे. बजेटचा सुद्धा अंदाज लावण्यात आला आहे. आमच्याकडे पुरेसा निधी आहे. देशात 6 कंपन्या रेमिडेसिवीरची निर्मिती करत आहेत. ते सहज सर्वत्र उपलब्ध आहे.