‘भीम’ अ‍ॅप वापरणाऱ्या 72 लाखापेक्षा अधिक जणांचे रेकॉर्ड ‘लीक’, सायबर गुन्ह्यातील सर्वात मोठी फसवणूक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत सरकारने सुरु केलेल्या मोबाइल पेमेंट अ‍ॅप भीमवरील डेटा लीक झाल्याची माहिती समोर येत आहेत. इस्त्रायलची सायबर सिक्युरिटी बेवसाईट व्हीएनमॉनेटरने दिलेल्या वृत्तानुसार, भीम अ‍ॅपचा डेटा लीक झाल्यामुळे 70 लाखापेक्षा अधिक लोकांच्या वैयक्तीक माहितीचा गैरवापर होण्याचा धोका आहे. कंपनीच्या मते सुमारे 409 जीबी डेटा लीक झाला आहे. ज्यामध्ये नाव, जन्म तारीख, वय, लिंग, घराचा पत्ता, जात, आधार कार्डचा तपशील आणि इतर गोपनीय माहितीचा समावेश आहे. युनिपाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच युपीआयवर आधारित असलेल्या भीम अ‍ॅपद्वारे ऑनलाइन आणि कॅशलेस व्यवहार सहज आणि सोपा झाला आहे.

मात्र, युजर्सची खासगी माहिती अडचणीत आली आहे. इस्त्रायली सिक्युरिटी फर्मने आपल्या एका अहवालात यासंदर्भात माहिती दिली आहे. भारतातील भीम अ‍ॅप वापरणाऱ्या जवळपास 70 लाख युजर्सचा खासगी डेटा लीक झाला आहे. ज्यावेळी भीम अ‍ॅपवर हा डेटा अपलोड करण्यात येत होता, त्याचवेळी हा डेटा लीक झाल्याचे या संस्थेने म्हटले आहे. सिक्युरिटी फर्मच्या अहवालानुसार एकूण 409 जीबी डेटा लीक झाला आहे. त्यामध्ये युजर्सची संपूर्ण माहितीचा समावेश आहे. या अहवालानुसार, ज्या वेबवसाईटमधून हा डेटा लीक झाला, त्याचा वापर भीम अ‍ॅपच्या प्रचारातील कॅम्पेनसाठी करण्यात आला होता. त्यावेळी भीम अ‍ॅपचे बिझनेस मर्चंट्स आणि युजर्सना अ‍ॅपसोबत जोडलं जात होतं.

डेटा अपलोडिग करतेवेळी, काही डेटा अमेझॉन वेब सर्व्हीस एस 3 बकेटमध्ये स्टोअर होत होता, जो सार्वजनिक झाला आहे. 2019 च्या फेब्रुवारी महिन्यात ही प्रक्रिया झाल्यंचही फर्मनं म्हटलं आहे. भीम अ‍ॅप युजर्सचा हा डेटा लीक झाल्यामुळे हॅकर्सकडून युजर्संची खाजगी माहिती पोहचली आहे. त्यामुळे युजर्संना हॅकर्सकडून शिकार बनवलं जाऊ शकतं. मात्र, एप्रिल महिन्यात ही बाब ठीक करण्यात आली. पण ज्यांचा डेटा लीक झाला आहे, त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. याबाबत भीम अ‍ॅप तयार करणाऱ्या नॅशनल पेमेंट्स कार्पोरेशन आणि कॉम्प्युटर इमरजेन्सी रिस्पॉन्स टीमकडून यासंदर्भात कोणतेही स्टेटमेंट जारी करण्यात आलेले नाही.