Coronavirus : केंद्रीय मंत्री कैलास चौधरी ‘कोरोना’ संक्रमित, रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी शनिवारी सांगितले की, त्यांची कोविड – 19 चाचणी सकारात्मक आली आहे आणि अलीकडे त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांविषयीच विचारले आणि चाचणी करून स्वत: ला आयसोलेट करण्यास सांगितले. चौधरी यांनी ट्विट करत म्हंटले कि, कोरोना विषाणूची काही लक्षणे आढळल्यानंतर हेल्थ स्क्रीनिंगचा एक भाग म्हणून मी कोरोना विषाणूची चाचणी केली असता, अहवाल सकारात्मक आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून ज्यांच्याशी संपर्क साधला होता त्यांना नम्रपणे विनंती कि, त्यांनी आयसोलेशन मध्ये जावे आणि स्वतःची चाचणी करावी. तुम्हा सर्वांचे आभार. त्यांनी सांगितले की, त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असून ताप आहे, याक्षणी ते रुग्णालयात दाखल आहे. ट्विटमध्ये चौधरी म्हणाले की, मला थोडा ताप आहे आणि मला श्वास घेण्यास त्रास होत आहे.

मी रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो कि, काळजी करू नका.तुम्ही मला फोन करू शकता. या ट्विटला उत्तर देताना बिहारमधील औरंगाबादचे भाजप खासदार सुशीलकुमार सिंह यांनी त्यांच्या त्वरित रिकव्हरीसाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, याआधी भाजपचे राज्यसभेचे खासदार किरोडी लाल मीणा यांचा कोरोना अहवाल सकारात्मक आला.