राजमातांपासून ज्योतिरादित्यांपर्यंत असा आहे ग्वाल्हेरच्या सिंधिया घराण्याचा राजकीय प्रवास, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर ग्वाल्हेर राजघराणे चर्चेत आले आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना त्यांच्या आजीची आठवण आली. त्यांच्या आजीची इच्छा होती की त्यांच्या कुटूबांने भाजपात राहावे. जिवाजीराव सिंधिया आणि विजयाराजे सिंधिया यांच्या पाच मुला-मुलींमधील माधवराव सिंधिया आणि त्यांचे पुत्र ज्योतिरादित्य सिंधिया हे दोघे सोडून सर्वजण भाजपातील आहेत. अनेकांना ग्वाल्हेरच्या सिंधिया घराण्याचा राजकीय प्रवास माहिती नाही.

विजयाराजे सिंधिया :
ग्वाल्हेर राजघराण्यातील राजमाता विजयाराजे सिंधिया यांनी 1957 मध्ये काँग्रेसमधून आपल्या राजकीय जीवनात सुरुवात केली. त्या गुना लोकसभा मतदार संघातून खासदार झाल्या. फक्त 10 वर्षात त्यांनी काँग्रेसला रामराम करत 1967 मध्ये जनसंघात प्रवेश केला. त्यांच्या या राजकीय कृतीमुळे जनसंघचा ग्वाल्हेरमध्ये प्रभाव वाढला. 1971 साली इंदिरा गांधी यांची लाट असताना देखील जनसंघ तीन जागांवर विजय मिळवण्यात यशस्वी ठरला. स्वत: विजयाराजे सिंधिंया भिंडमधून, अटल बिहारी वाजपेयी ग्वाल्हेरमधून आणि विजयाराजे सिंधिया यांचे पुत्र आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांचे वडील माधवराव सिंधिया हे खासदार झाले.

माधवराव सिंधिया :
माधवराव सिंधिया आपल्या आई वडीलांचे एकुलते एक पुत्र. चार बहीणींमध्ये ते एकटे भाऊ. ते फक्त 26 वर्षांचे असताना खासदार झाले. परंतु जास्त काळ जनसंघात थांबले नाहीत. 1977 मध्ये आणीबाणीनंतर ते जनसंंघ आणि आपल्या आई पासून दूर झाले. 1980 मध्ये माधवराव सिंधिया काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले आणि केंद्रीय मंत्री झाले. त्यांचा 2001 साली विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. ज्योतिरादित्य सिंधिया यांचे पुत्र आहेत.

वसुंधराराजे सिंधिया :
विजयाराजे सिंधिया यांच्या मुली वसुंधराराजे सिंदिया आणि यशोधराराजे सिंधिया यांनी राजकारणात प्रवेश केला. 1984 मध्ये वसुंधरा राजे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये सहभागी झाल्या. त्या राजस्थानच्या मुख्यमंत्री देखील झाल्या होत्या.

यशोधराराजे सिंधिया :
यशोधराराजे 1977 साली अमेरिकेत निघून गेल्या. त्यांना तीन मुलं आहेत परंतु त्यांनी राजकारणात येण्याची इच्छा दाखवली नाही. 1994 साली त्या भारतात परतल्या. आईच्या इच्छेखातर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि 1998 साली भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या. 5 वर्ष आमदार असलेल्या यशोधरा राजे सिंधिया शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारमध्ये मंत्री होत्या.

ज्योतिरादित्य सिंधिया : 
2001 मध्ये माधवराव सिंधिया यांच्या मृत्यूनंतर ज्योतिरादित्य सिंधिया काँग्रेसमधील मजबूत नेते बनले. गुना पोटनिवडणूकीत ते खासदार झाले. 2002 नंतर ते कधीही निवडणूकीत हारले नाहीत. परंतु 2019 मध्ये लोकसभा निवडणूकीत त्यांचा मोठा पराभव झाला. कृष्णपाल सिंह यादव यांनी त्यांचा पराभव केला. यानंतर आता ज्योतिरादित्य सिंधिया यांनी 10 मार्च 2020 मध्ये काँग्रेसचा राजीनामा दिला.

दुष्यंत सिंह :
ग्वाल्हेर राजघराण्याची संबंधित असलेले राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे पुत्र दुष्यंत सिंह देखील भाजपात आहेत. ते राजस्थानच्या झालावाडमधून खासदार आहेत.