‘तुकडे-तुकडे’ गँगची ‘पोस्टर गर्ल’ उर्वशी चुडावालासह शरजील इमाम च्या 51 समर्थकांवर ‘कारवाई’, देशद्रोहाचा FIR

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईमध्ये शरजील इमामच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्यामुळे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आझाद मैदान पोलिसांनी तुकडे-तुकडे गँगची ‘पोस्टर गर्ल’ उर्वशी चुडावालासह 51 हून अधिक जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. उर्वशी चुडावाला ही टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत मास कम्युनिकेशनची विद्यार्थीनी आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आरोपींची कसून चौकशी केली जाणार आहे. उर्वशी चुडावाला हिने सोशल मिडियावर शेअर केलेल्या पोस्टरबाबतही तपास केला जाणार आहे. चुडावाला हिला चौकशीसाठी 2 वेळा बोलावण्यात आले पण ती आली नाही. या आंदोलकांवर देशद्रोह (१२४ ए), राष्ट्रीय अखंडतेचा पूर्वग्रह (१५३ बी) आणि सार्वजनिक गैरवर्तन विधान (५०५ )अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मुंबईत तृतीयपंथीयांनी काढलेल्या परेडमध्ये शरजील इमाम याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली होती. क्विर आझादी चळवळीच्या संयोजकांनी पोलिसांना सांगितले की, या परेडमध्ये सहभागी झालेल्या काही गटातील लोकांकडून अशा घोषणा दिल्या जातील याबद्दल आम्हाला माहिती नव्हते. क्युएएमच्या आयोजन समितीनेही या घोषणाबाजीचा निषेध केला आहे.