‘कोरोना’चा प्रसार रोखण्यात N-95 मास्क ‘अयशस्वी’, केंद्र सरकारनं राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना ‘तात्काळ’ कळवलं

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   देशात वाढत्या कोरोना संक्रमणादरम्यान लोक विषाणूला टाळण्यासाठी सर्व प्रकारचे उपाय करीत आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे एन-95 मास्क परिधान करणे आवश्यक मानले जाते. त्याच बरोबर भारत सरकारचे आरोग्य सेवा महासंचालक डॉ राजीव गर्ग यांनी राज्य व केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून एन-95 मास्क विषयी माहिती दिली आहे. नवीन सरकारी माहितीनुसार एन-95 मास्कचा वापर कोरोनाचा प्रसार रोखण्यात अयशस्वी ठरला आहे. कारण हे विषाणूला मास्कमधून बाहेर पडण्यापासून रोखत नाही.

देशात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. भारतात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 11 लाख 18 हजारांवर पोहोचली आहे, तर मृत्यू झालेल्यांची संख्या 27 हजारांवर पोहोचली आहे. भारत हा जगातील तिसरा सर्वाधिक संक्रमित देश आहे. भारतात संक्रमितांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वात संक्रमित राज्य आहे. येथे संसर्ग झालेल्यांची संख्या तीन लाखांच्या पुढे गेली आहे. यांनतर तामिळनाडू आणि देशाची राजधानी दिल्ली येथे सर्वाधिक संसर्ग झाला आहे.