आसाराम बापूचा मुलगा बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आसारामचा मुलगा नारायण साईला सुरत बलात्कार प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवले असून ३० एप्रिल रोजी त्याच्या शिक्षेची सुनावणी होणार आहे. आज न्यायालयात सुरत बलात्कार केस प्रकरणाची सुनवाणी होती. सुरतच्या सत्र न्यायालयात आज सुनावणी झाली त्यावेळी दोन्ही पक्षांची बाजू ऐकून न्यायालयाने पुराव्यांच्या आधारे नारायण साईला दोषी ठरवले.

सुरत येथे राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींवर बलात्कार केल्याचा आरोप आसारामचा मुलगा नारायण साईवर आहे. पीडित छोट्या बहिणीने आपल्या जबाबात नारायण साई विरोधात ठोस पुरावे आणि घटनास्थाळाची ओळख पटवून दिली होती. तसेच पीडित मोठ्या बहिणीने आसारामच्या विरोधात तक्रार दिली होती. आसाराम विरुद्ध गांधीनगरच्या न्यायालयात खटला सुरू आहे.
ऑक्टोबर २०१३ मध्ये सूरत पोलिसांनी नारायण साई विरुद्ध बलात्कार, लैंगिक शोषण, अनैतिक संबंध बनवणे इत्यादी आरोप त्याच्यावर लावले आहेत. सलग तीन वर्षे लैंगिक शोषण केल्याचा आरोप नारायणवर होता. नारायण विरोधात न्यायालयात ५३ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले होते. ज्यामध्ये ज्यांनी नारायण साईला मुलींवर अत्याचार करताना पाहीले होते.

You might also like