‘शाहीन बाग’ आंदोलनामुळं दुखा: त ‘ही’ 10 वर्षाची ‘राष्ट्रीय शौर्य पुरस्कार’ विजेती मुलगी, सरन्यायाधीशांना पत्र लिहून केली ‘ही’ विनंती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीच्या शाहीन बाग येथे नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA) निषेधार्थ चालू असलेल्या आंदोलनात मागील काही दिवसांत ४ महिन्याच्या नवजात बाळाच्या मृत्यूवर १० वर्षाच्या एका मुलीने सीजेआई ला पत्र लिहून विनंती केली आहे.

‘राष्ट्रीय शौर्य पुरस्कार’ जिंकणारी १० वर्षाची मुलगी जेन गुणारत्न सदावर्ते (Zen Gunratan Sadavarte) ने चीफ जस्टिस ऑफ इंडिया (CJI) यांना पत्र लिहिले आहे. जेन ने सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहून विनंती केली आहे की यासारख्या धरणा प्रदर्शनात लहान मुलांना समाविष्ट करू नये. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक सूचना करायला हव्यात असे तिने पत्रातून सांगण्याचा प्रयत्न केला.

जेन गुणारत्न सदावर्ते ही एक शूर मुलगी असून जेनला या वर्षीचा राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देखील मिळाला आहे. जेनला मुंबईच्या क्रिस्टल टॉवर मध्ये लागलेल्या आगीतून १७ लोकांना वाचविण्याबद्दल या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जेन ने शाळेत असतानाच अपघातांना सामोरे कसे जावे याचे धडे घेतले होते.

सर्वोच्च न्यायालय शाहीन बागेतील नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकेवर ७ फेब्रुवारीला सुनावणी करणार आहे. वकील व सामाजिक कार्यकर्ते अमित साहनी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून शाहीन बागेकडे जाणारा बंद केलेला रस्ता खुला करण्याची मागणी केली आहे. या व्यतिरिक्त याचिकाकर्त्यांची मागणी आहे की हिंसा थांबविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांनी या संपूर्ण प्रकरणात लक्ष ठेवावे.