National Panchayati Raj Day : PM नरेंद्र मोदींनी केली सरपंचांसोबत बातचीत, जाणून घ्या 10 महत्वाचे मुद्दे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात कोरोनाचे संकट सुरु असताना पंचायत राजदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील सर्व ग्रामपंचायतींच्या प्रमुखांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी नव्या ई-ग्राम वेबपोर्टलचे उद्घाटन केले. या वेबपोर्टनच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या सर्व योजनांची माहिती मिळणार असून, ग्राम पंचायतीच्या सर्व समस्यांची माहितीही या पोर्टलद्वारे मिळणार आहे. आम्ही सर्वांनी स्वावलंबी बनायला हवे हे कोरोनाच्या संटकटाने आपल्याला शिकवले असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांच्या संवदातील 10 महत्त्वाच्या गोष्टी
1. सरपंचांशी झालेल्या चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोरोना विषाणूच्या साथीचा आपल्या जीवशैलीवर आणि काम करण्याची पद्धत बदलली आहे. आता आम्ही एकमेकांना भेटून बोलू शकत नाही. या संकटात तंत्रज्ञानामुळे आपण एकमेकांशी संपर्क साधू शकत आहोत. यामुळे आज अशी बैठक घेणे शक्य आहे. ज्यांनी पंचायती राज पुरस्कार जिंकला त्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

2. पीएम मोदी म्हणाले की, कोरोना व्हायरसने आपल्या मार्गात अनेक आव्हाने दिली आहेत. परंतु जीवनातल्या अशा परिस्थितीतून आपण नेहमी काहीतरी शिकले पाहिजे. कोरोनाने देखील आपल्याला विचार करण्यासारखे बरेच काही दिले आहे आणि आपल्याला काम करण्याच्या पद्धतीबद्दल बरेच काही शिकवले आहे.

3. कोरनाच्या संकटामुळे आम्ही स्वावलंबी व्हायला हवे असा संदेश मिळाला आहे असे मोदी म्हणाले. स्वावलंबी बनल्याशिवाय आम्ही या संकटाचा सामना करू शकणार नाही. यात ग्रामपंचायतीचे मोठे योगदान आहे. यामुळे लोकशाही मजबूत बनणार आहे.

4. कोरोनाच्या या संकटकाळात गावातील लोकांना संपूर्ण जगाला मोठा संदेश दिला आहे आणि तो म्हणजे ‘दो गज दुरी’ हा. सोशल डिस्टन्सिंग म्हणण्यापेक्षा दो गज दुरी असे म्हणत आहे आणि या संदेशाने मोठे काम केले आहे, असे मोदी म्हणाले.

5. पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटले की कोरोना व्हायरसच्या या संकट काळात मर्यादित स्त्रोत आणि अडचणी असूनही देशातील नागरिक संकटासमोर गुडघे टेकण्याऐवजी त्याचा धैर्याने सामना करत आहेत. अडचणी आहेत, मात्र देश एका नवीन बांधिलकीने पुढे जात आहे.

6. 5 ते 6 वर्षापूर्वी देशात केवळ 100 पंचायी ब्रॉडबँडशी जोलल्या गेल्या होत्या. मात्र आज सव्वा लाख ग्रामपंचायतीपर्यंत ही सुविधा पोहचली आहे. सुरु करण्यात आलेल्या वेबसाईट्मुळे गावांपर्यंत महिती आणि मदत जलद गतीने मिळणार आहे.

7. पंतप्रधान मोदी सरपंचांशी बोलताना म्हणाले की, आज सरकारने ग्राम स्वराज्या आणि स्वामित्व नावाची योजना सरु केली आहे. ही योजना पंचायत राज मंत्रालय, राज्य पंचायीती राज विभागा, राज्य महसूल विभाग आणि भारतीय सर्वेक्षण यांच्या सहकार्याने ग्रामीण भागातील निवासी जमिनीच्या सीमांकनासाठी एकात्मिक मालमत्ता पडताळणी मार्ग प्रदान करते.

8. आपल्या सर्वांना अॅप आणि ई-ग्राम स्वराज्य वेबसाईटवमध्ये सहभागी व्हावे लागले. हे आपल्या सर्वांसाठी वरदान ठरेल आणि मालमत्तेपासून उत्त्पन्नाची नोंद ठेवण्यास मदत करेल.

9. सध्या स्वामित्व योजना 6 राज्यामध्ये सुरु होईल. ही योजना राज्या उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक, हरियाणा आणि महाराष्टात सुरु होईल. यानंतर हळूहळू इतर राज्यांचा देखील यामध्ये समावेश केला जाईल.

10. पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वी आजच्या या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंचायती राज्यमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना पत्र लिहले, शूर योद्ध्याप्रमाणे कोरोना विषाणूचे आव्हान लढण्यासाठी कटिबद्ध असलेली पंचायती राज व्यवस्थेचे सदस्य प्रेरणास्त्रोत आहेत. या लढाईत ही संयुक्त शक्ती ही आपली ताकद आहे. आपण आपल्या एकतेने या साथीचा पराभव करू शकतो असा विश्वास आहे.