Weather Updates : अजूनही थांबलेला नाही पावसाचा ‘कहर’, देशातील ‘या’ राज्यांसाठी पुन्हा जारी करण्यात आला अलर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशाच्या विविध राज्यात जोरदार पाऊस पडत आहे. राजस्थानमधील जयपूर, गुजरातमधील द्वारका आणि आंध्र प्रदेशात मुसळधार पावसामुळे रस्ते भरले आहेत. मुसळधार पावसाच्या दरम्यान पुन्हा एकदा हवामान खात्याने देश आणि राज्यातील अनेक भागांसाठी अलर्ट जारी केला आहे. भारत हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार येत्या पाच दिवसांत उत्तर पश्चिम भारतात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, येत्या चार ते पाच दिवसांत उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमधील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. देशाची राजधानी दिल्लीतही पाऊस पडण्याची शक्यता आहे.

यासह, हवामान खात्याने दक्षिण राजस्थान, मध्य महाराष्ट्राबाबत अलर्ट जारी केला आणि सांगितले की, येथे 15 ऑगस्ट रोजी म्हणजेच शनिवारी पाऊस पडेल. कोकण आणि गोव्यातही आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 15 आणि 16 रोजी छत्तीसगडमध्ये, 15 ला ओडिशा आणि तेलंगणा आणि सौराष्ट्र आणि कच्छ येथे 18 आणि 19 ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ओडिशामध्ये मुसळधार पाऊस

भुवनेश्वरच्या हवामान कार्यालयाचे संचालक एचआर विश्वास म्हणाले की, उत्तर किनारपट्टी ओडिशामध्ये अजूनही कमी दाबाचे क्षेत्र आहे आणि ते असेच राहील . ओडिशाच्या उत्तर जिल्ह्यांमध्ये गेल्या चोवीस तासांपासून मुसळधार पाऊस पडला आहे. राज्यातील चांदीखोल, जाजपूर जिल्ह्यात सर्वाधिक 340 मिमी पाऊस झाला.

दरम्यान, दक्षिण भारतातील आंध्र प्रदेशात गेल्या कित्येक दिवसांपासून पाऊस पडत आहे. यामुळे राज्यातील कृष्णा जिल्ह्यातील मुन्नारू नदीच्या पाण्याची पातळी सतत वाढत आहे. गुजरातमध्येही गेल्या कित्येक दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. द्वारकाच्या खांभलिया येथे पावसाच्या पाण्याच्या मध्यभागी एक बस अडकली. त्यानंतर स्थानिकांनी बस दोरीच्या सहाय्याने सुरक्षित ठिकाणी नेली. दुसरीकडे राजस्थानच्या राजधानी शहरात काल मुसळधार पावसामुळे पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली. मुसळधार पावसामुळे शहरभरातील रस्ते पाण्यात बुडाले, अनेक वसाहती व सखल भाग पाण्याखाली गेले. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये येत्या काही दिवसांत मुसळधार पावसाचा टप्पा सुरू राहणार आहे. अजमेर, भिलवाडा आणि राजसमंद यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.

देशाच्या इतर भागाबद्दल बोलायचे झाल्यास बिहार आणि आसाममध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती आहे. आसाममधील पुरामुळे आतापर्यंत शेकडो वन्य प्राण्यांचा मृत्यू झाला आहे.