नीरव मोदीचा मुक्‍काम लंडनमध्येच, चौथ्यांदा जामिन अर्ज फेटाळला

लंडन वृत्तसंस्था – पंजाब नॅशनल बँकेसह भारतातल्या सरकारी बँकांची करोडो रुपयांची फसवणूक करून लंडनला पळून गेलेल्या नीरव मोदीचा जामीन अर्ज लंडन कोर्टाने फेटाळला आहे. न्यायालयाने निरव मोदींना जामीन देण्यास नकार दिला आहे. त्यात न्यायाधीशांनी असे म्हंटले आहे कि मोदी जामीनवर सुटल्यास पुराव्यात फेरफार होऊ शकते. 

आतपर्यंत नीरव मोदीचा जामीन अर्ज चौथ्यांदा फेटाळण्यात आला आहे.त्यामुळे तो आता लंडनच्या तुरुंगातच राहणार आहे. त्यानंतर भारताकडून त्याला  भारतात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. नुकताच युकेच्या वेस्टमिनस्टर कोर्टाने गेल्या महिन्यात त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. नीरव मोदी मागील काही दिवसांपासून फरार असून त्यांनी भारतीय बँकांची १३ हजार कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. मोदीच्या या कारनाम्यामुळे पीएनबी बँक डबघाईला आली होती. हा सगळा प्रकार समोर आल्यावर एकच खळबळ माजली. याच दिवसांत नीरव मोदी देश सोडून फरार झाला. तेव्हापासून भारत सरकार नीरव मोदीला भारतात आणण्याचे प्रयत्न करत आहे. त्यानंतर नीरव मोदीला लंडनमध्ये अटक करण्यात आली.

दरम्यान, युकेमधून नीरव मोदींना जर भारतात आणले तर त्यांची  रवानगी मुंबईमधल्या आर्थर रोड  तुरुंगात केली जाणार असल्याची माहिती आहे.

आरोग्यविषयक वृत्त

तांब्याची बॉटल खरेदी करताना घ्या ही काळजी

हाताला ६ बोटे असणे असते फायद्याचे

डासांमुळे होणाऱ्या या आजारांना ‘घरगुती’ पद्धतीने घाला आळा.

पाहिल्या पाऊसाचा आनंद घ्या मनसोक्त, बिनधास्त भिजा

 

Loading...
You might also like