Ayodhya Ram Mandir Model : भूमीपूजनच्या अगोदर समोर आली नव्या मॉडलची छायाचित्रे, असे दिसेल राम मंदिर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   श्रीराम जन्मभूमीवर भव्य-दिव्य मंदिरासाठी बुधवारी भूमीपूजन होत आहे, परंतु, त्यापूर्वीच मंदिराच्या नव्या मॉडलची छायाचित्रे समोर आली आहेत. भूमीपूजनचे तीन दिवसीय अनुष्ठान सोमवारी सकाळी नऊ वाजता सुरू झाले. पंतप्रधान नरेंद मोदींच्या हस्ते भूमी आणि शिलापूजन करण्यात येणार आहे, यादरम्यान अनेक विशेष व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.

पहिल्या मॉडलमध्ये दोन घुमट आणि शिखर बनवले होते. आता यामध्ये घुमटांची संख्या पाच केली आहे. शिखराची उंची 161 फुट केली आहे. मंदिराचा आकार सुद्धा मोठा केला आहे. यामध्ये एक हजारपेक्षा जास्त भाविकांना बसण्याची जागा असेल. राम मंदिराचे बांधकाम ज्यादिवशी सुरू होईल, त्या दिवसापासून सुमारे तीन किंवा साडेतीन वर्षात ते पूर्ण होईल. याशिवाय मंदिर बांधकामासाठी समाजातून धन संग्रह केला जाईल.

राम मंदिर ट्रस्टचे सदस्य कामेश्वर चौपाल यांनी सांगितले की, प्रस्तावित राम मंदिर मॉडल 128 फुट ऊंच आहे, जे वाढवून 161 फुट ऊंच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय गाभार्‍याच्या जवळपास 5 घुमट बनवण्यात येतील, अगोदर तीन घुमट होते. राम मंदिर ट्रस्टचे सदस्य कामेश्वर चौपाल यांनी सांगितले की, राम मंदिर आराखड्याच्या पायाच्या दगडांचे कोरीव काम पूर्ण झाले आहे.

राम मंदिराच्या भूमिगत जागेत सिंहद्वार, गर्भगृह, नृत्यद्वार, रंगमंडप तयार करण्यात येईल. याशिवाय मंदिरात 212 खांब असतील. ज्यापैकी पहिल्या मजल्यावर 106 खांब आणि दुसर्‍या मजल्यावर 106 खांब बनवण्यात येतील. प्रत्येक खांबात 16 मूर्ती असतील आणि मंदिरात दोन चबूतरे असतील.

पंतप्रधान बुधवारी रामगरीत दोन तास पन्नास मिनिट प्रवास करतील. त्यांचे हेलीकॉप्टर सकाळी 11:30 वाजता राम जन्मभूमी परिसरापासून पाचशे मीटर अंतरावरील साकेत महाविद्यालयाच्या हॅलिपॅडवर उतरेल, परंतु पंतप्रधान अगोदरच ठरल्याप्रमाणे 12:15 वाजता आधारशिला ठेवतील. यामध्ये नऊ विटा वापरण्यात येतील, ज्या चार दिशांना, चार कोनात आणि देवता स्थानावर असतील. यापूर्वी सुमारे 10 मिनिटपर्यंत पंतप्रधान रामजन्मभूमी, स्थान-वास्तूसह आधारशिलेत लागणार्‍या वीटांचे पूजन करतील.