Coronavirus : ‘UV रॅकेट’ फिरवताच ‘संक्रमण’मुक्त होतील वस्तू, ‘कोरोना’विरूद्धच्या लढ्यात होईल ‘मदत’, जाणून घ्या

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  –   संशोधकांनी अतिनील प्रकाश (अल्ट्राव्हायोलेट लाइट) असलेले एक रॅकेट तयार केले आहे, ज्याला केवळ पंख्यासारखे फिरवल्याने कोरोनाच्या संक्रमणाचा धोका दूर होईल. याच्या माध्यमाने रेशनचे सामान, ई-कॉमर्स पॅकेट्स, चाव्या, चलन नोटांपासून वाहनांपर्यंत सर्व प्रकारच्या पृष्ठभागांना संक्रमणमुक्त केले जाऊ शकते. हे रॅकेट कोरोना संक्रमणाविरूद्ध सुरू असलेल्या लढ्यात उपयुक्त ठरू शकते. विशेष म्हणजे औद्योगिक उत्पादन सुरु झाल्यास त्याची किंमत अवघ्या एक हजार रुपयांच्या जवळपास राहील.

रॅकेट तयार करणार्‍या संशोधकांनी सांगितले की 80 सेंटीमीटर लांबीच्या या अंडाकृती रॅकेटवर यूवीसी ट्यूब लावले आहेत. याच्या माध्यमातून 200-280 नॅनोमीटरचे वेव्ह अल्ट्राव्हायोलेट लाइट सोडतात. यंत्राची दुसरी बाजू धातुच्या शीटने आच्छादित आहे, जेणेकरून याचा वापर करणार्‍या व्यक्तीला प्राणघातक अतिनील किरणांचा धोका नसावा.

पंजाब स्थित लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (एलपीयू) चे सहाय्यक प्राध्यापक मंदीप सिंह म्हणाले, सध्याच्या साथीच्या रोगात आपण आपल्या सुरक्षिततेविषयी अधिक जागरूक राहण्याची गरज आहे. आपण बाहेरून आपल्या घरी ज्या वस्तू आणत असतो त्या प्रत्येक वस्तूला संक्रमणमुक्त करणे गरजेचे आहे. आमचे अल्ट्राव्हायोलेट रॅकेट वस्तूंना संक्रमणमुक्त करण्यास सक्षम आहे. बॅगपासून ते बाहेरून आणलेल्या खाद्यपदार्थांच्या वस्तू आणि ई-कॉमर्स पॅकेटवर काही काळ रॅकेट फिरवल्यास संक्रमणाचा धोका कमी होईल.

संशोधकांनी सांगितले की हे रॅकेट संबंधित वस्तूच्या वर चार ते पाच इंच अंतरावरुन एक मिनिट पर्यंत फिरवले पाहिजे. मानवी हस्तक्षेप असतो तेव्हा रॅकेट कार्य करणे थांबवते. अशी तरतूद यासाठी केली गेली आहे की एखाद्या व्यक्तीच्या त्वचेला कोणतीही इजा पोहोचू नये.

युनिव्हर्सिटीचे बीटेकचे विद्यार्थी अनंतकुमार राजपूत म्हणाले की, या रॅकेटमध्ये टाइमर देखील आहे जे एक मिनिटानंतर बीपचा आवाज देते. मनदीप सिंग आणि प्रकल्प अधिकारी राहुल अमीन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अनंत यांनी हे रॅकेट तयार केले आहे. टीमने या रॅकेटच्या पेटंटसाठी अर्ज केला आहे. यास बाजारात आणण्यासाठी औद्योगिक भागीदारांचा शोधही सुरू झाला आहे.