निर्दयी आईनं ‘अल्लाह’ला कुर्बानी देण्यासाठी स्वतःच्याच मुलाचा चिरला गळा

पलक्कड : पोलीसनामा ऑनलाईन – अल्लाहला खूश करण्यासाठी मदरसामधील महिला शिक्षिकेने स्वत:च्या 6 वर्षीय चिमुकल्याचा गळा चिरून त्याची हत्या केली. केरळच्या पलक्कड जिल्ह्यात रविवारी (दि. 7) पहाटे ही ह्दयद्रावक घटना घडली आहे. मुलाची हत्या करून आरोपी महिलेने स्वतः पोलीस आणि तिच्या नातेवाईकांना याची माहिती फोन करून दिली. या महिलेच्या अंधविश्वासाला पाहून तिच्या नातेवाईकांना आणि पोलिसांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 वर्षीय निर्दयी मातेने ज्या मुलाची हत्या केली तो 3 मुलांपैकी सर्वात लहान मुलगा होता. चिमुकला मुलगा आईसोबत बेडवर झोपला होता, तेंव्हा तिने मुलाला उठवून बाथरूमला घेऊन गेली. त्याठिकाणी मुलाचे हातपाय बांधले. त्यानंतर तिने मुलाचा गळा चिरला, यावेळी मुलगा तडफडत होता तरीही आईला दया आली नाही. घटनेच्यावेळी आरोपी महिलेची दोन्ही मुले वडिलांसोबत दुसऱ्या रुममध्ये झोपली होती. आरोपी महिलेचा पती काही दिवसांपूर्वीच परदेशातून भारतात परतला होता.

आरोपीने सांगितले की, मी माझ्या मुलाची कुर्बानी अल्लाहसाठी दिली आहे. एक महिला स्वत:च्या मुलाला कसे मारू शकते असा प्रश्न सगळ्यांच्या मनात पडला आहे. आरोपी महिलेच्या कबुलीजबाबानंतर तिला पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेवर कडक कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.