न्यायाधीशांना Your Honour म्हणाल्याने सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्याला फटकारले, म्हणाले – ‘हे अमेरिकेचे कोर्ट नाही’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुप्रीम कोर्टात एका प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी व्यक्तिगत प्रकारे सादर कायद्याच्या विद्यार्थ्याने न्यायाधीशांना युअर ऑनर म्हटल्याने भारताच्या मुख्य न्यायाधीशांनी आक्षेप घेतला.

न्यायालयांमध्ये न्यायाधीशांच्या नियुक्त्यांचे प्रकरण सर न्यायाधीश अरविंद बोबडे, न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना आणि न्यायमूर्ती व्ही. रसासुब्रमण्यम यांच्या खंडपीठासमोर जेव्हा सुनावणीसाठी आले तेव्हा व्यक्तीगत प्रकारे सादर होत असलेल्या याचिकाकर्ता कायद्याच्या विद्यार्थ्याने न्यायाधीशांना युअर ऑनर संबोधले, परंतु न्यायमूर्ती बोबडे यांनी त्यास म्हटले की, तुम्ही चुकीच्या शब्दाची निवड केली आहे.

तुमच्या संबोधनावरून वाटते की, तुमच्या डोक्यात अमेरिकन कोर्ट आहे. विद्यार्थ्याने ताबडतोब पीठाकडे माफी मागत म्हटले की, तो न्यायालयास युअर लार्डशिप म्हणून संबोधीत करेल. पीठाने प्रकरणाबाबत विद्यार्थ्याने केलेल्या तयारीवर सुद्धा प्रश्न उपस्थित केले आणि म्हटले, तुम्ही तयारी करून या. प्रकरणाची सुनावणी चार आठवड्यासाठी स्थगित केली जात आहे.