जाणून घ्या : कोण आहेत पवन जल्लाद ज्यांनी निर्भयाच्या दोषींना फासावर लटकवलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अखेर सात वर्षे आणि तीन महिन्यांनंतर आज निर्भया दोषींना फाशी देण्यात आली. पवन जल्लाद याने या चौघांना फाशी दिली. त्याच्या चारही पिढ्या हेच काम करत आहेत. उत्तर प्रदेश सरकारच्या मेरठ कारागृहातील तो अधिकृत जल्लाद आहेत. त्याला दरमहा पगाराची निश्चित रक्कमही मिळते. पवन हा मेरठचा रहिवासी आहे. दरम्यान, या शहरात कदाचित त्याला फार कमी लोक ओळखत असतील. तो पार्ट टाइम शहरात दुचाकींवर कपडे विक्रीचे काम करतो. सद्यस्थितीत, हे काम केवळ काही अधिकृत जल्लादच करत आहेत. पवन सध्या 57 वर्षांचा आहे. तो फक्त एक व्यवसाय म्हणून फाशीचे काम पाहतो. तो म्हणतो की, एखाद्या व्यक्तीला न्यायपालिकेने शिक्षा दिली असावी कारण त्यानेही तसेच काम केलेले असावे, तरच त्याला फाशी देऊन शिक्षा होईल म्हणजेच तो केवळ प्रामाणिकपणानेच आपले काम करतो.

चार दशकांहून अधिक काळापासून तो हे काम करत आहे. किशोरवायमध्ये तो त्याचे आजोबा काळू जल्लाद यांच्यासोबत फाशीच्या कामात त्यांना मदत करत असे. वडील लक्ष्मण सिंग यांच्या निधनानंतर 1989 मध्ये काळू जल्लाद यांनी ही नोकरी स्वीकारली. आपल्या कारकीर्दीत काळूने 60 हून अधिक लोकांना फाशी दिली. यात इंदिरा गांधींचे मारेकरी सतवंत सिंह आणि केहर सिंह यांनाही फाशी देण्यात आली. यापूर्वी त्याने रंगा आणि बिल्ला यांना फाशी देण्याचे कामही केले होते. पवनचा दावा आहे की, त्याचे बाबा लक्ष्मण सिंहने ब्रिटिशांच्या काळात लाहोर तुरूंगात भगतसिंग व त्याच्या साथीदारांना फाशी दिली होती. पवनच्या कुटुंबात नऊ सदस्य आहेत. तसेच त्याला पाच मुली आणि दोन मुलं अशी सात अपत्य आहेत. दरम्यान, त्याच्या मुलाला जल्लाद बनायचे नाही.

दरम्यान, फाशी देण्यात आलेल्या या चारही नराधमांनी 16-17 डिसेंबर 2012 च्या रात्री निर्भया या पॅरामेडिकल विद्यार्थिनीवर बलात्कार करत तिची निर्घृण हत्या केली. या व्यतिरिक्त पीडितेला चालत्या बसमधून खाली फेकण्यात आले. ज्यामुळे पीडितेला गंभीर दुखापत झाली. सिंगापूर येथे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.