Coronavirus : नीती आयोगाचे CEO अमिताभ कांत यांनी जागतिक ‘महामारी’ला तोंड देण्यासाठी सांगितले ‘हे’ 10 उपाय, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी जागतिक महामारी कोविड-19 विरूद्ध भारताचे प्रयत्न यशस्वी करण्यासाठी सोमवारी दहा उपाय सांगितले. ही दहा पावले उचलून देश या महामारीच्या विळख्यातून लवकर बाहेर पडू शकतो, असा दावा कांत यांनी केला आहे. हे दहा उपाय असे आहेत…

1 पहिले पाऊल :

कोविड-19 च्या तपासणीसाठी मोठ्या प्रमाणात टेस्टींग कराव्यात. न्यूझीलँडमध्ये याच पद्धतीने व्हायरसचे पूर्णपणे उच्चाटन केले गेले, भारतीय राज्य केरळ आणि कर्नाटक याचे उदाहण आहे.

2 दूसरे पाऊल :

खोलवर काँटॅक्ट ट्रेसिंग करावे. दक्षिण कोरियाने हिच रणनिती अवलंबून यश मिळवले आहे. न्यूझीलँडने यासंबंधात प्रत्येक ठिकाणी लोकांना क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगितले होते, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीचे लोकेशन समजावे.

3 तिसरे पाऊल :

कोविड-19 चे निदान लवकर केल्याने संसर्ग रोखता येऊ शकतो.

4 चौथे पाऊल :

वेगळ्या क्वारंटाईन केंद्रांची स्थापना केल्यास मोठे यश मिळू शकते. ज्या देशांनी विमानतळावरून जाणार्‍या-येणार्‍या लोकांना तेथेच क्वारंटाईन केले ते आज कोरोना मुक्त आहेत.

5 पाचवे पाऊल :

लॉकडाऊन हा कायमस्वरूपी उपाय नाही. यासाठी कार्यस्थळांवरच शारीरीक अंतराचे सर्व नियम आणि संसर्गापासून वाचण्याच्या सर्व पद्धतींचे संपूर्ण सक्तीने पालन व्हावे.

6 सहावे पाऊल :

सर्व आकडे समान ठेवून संसर्गाचे योग्य विश्लेषण व्हावे, म्हणजे वेळ मिळताच योग्य रणनिती तयार करता यईल. आकडे लपवले जाऊ नयेत.

7 सातवे पाऊल :

मोठ्या प्रमाणात संसर्ग रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक उपयोग केला जावा.

8 आठवे पाऊल :

नियमांचे सक्तीने पालन केले जावे.

9 नववे पाऊल :

कोविड काळात कोरोना वॉरियर्स आणि यात मुख्य मोर्चावर असणारे कर्मचारी यांना ऑनलाईन प्रशिक्षण आणि प्रोटोकॉलची पूर्ण माहिती देण्यात यावी.

10 दहावे पाऊल :

सरकारी प्रयत्नांसह जनसहकार्य सुद्धा जरूरी आहे. अन्यथा सर्व प्रयत्न अपूर्ण राहतील.