नितीन गडकरी IAS अधिकाऱ्यावर संतापले ! म्हणाले – ‘पैसे नाही तर हिम्मत कमी’, महाराष्ट्र सरकारवर साधला ‘निशाणा’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – पैशांची आजिबात कमतरता नाही, जी काही कमतरता आहे ती महाराष्ट्र सरकारच्या हिमतीमध्ये आहे, सरकारच्या काम करण्याच्या मानसिकतेमध्ये कमी आहे अशा प्रकारचे ताशेरे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्र सरकारवर ओढले आहे. गडकरी एका कार्यक्रमादरम्यान आयएएस अधिकाऱ्यांवरून सध्याच्या सरकावर देखील भडकले.

विश्वेश्वरैया राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थेच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करताना नितीन गडकरी म्हणाले की, ‘मी तुम्हाला खरे सांगतो, पैशाची कमतरता नाही, एक नकारात्मक दृष्टीकोन आहे आणि निर्णय घेण्यामध्ये जी हिम्मत हवी ती त्यांच्यामध्ये नाही.

गडकरी म्हणाले, परवा मी एका कार्यक्रमादम्यान मंचावर होतो त्यावेळी सांगत होते आम्ही हे करू, ते करू मी म्हणालो तुम्ही काय सुरु करणार ? तुमची सुरु करण्याची ताकद असती तर तुम्ही इथं येऊन आयएएस ऑफिसर बनून इथे नोकरी थोडी करता ? याव्यतिरिक्त तुम्ही जाऊन एखादा व्यवसाय सुरु करू शकला असता. तुम्ही या वादात पडू नका की, वी आर ओनली फैसिलिटेटर. अशा शब्दात नितीन गडकरी यांनी आयएएस अधिकाऱ्यांना सुनावले आहे.

या कार्यक्रमानंतर गडकरी हे थेट क्रिकेटच्या मैदानावर पहायला मिळाले. याव्यतिरिक्त नागपूर शहरातील इतर मैदानावर जाऊन देखील त्यांनी खेळाडूंना भेटी दिल्या.

या व्यतिरिक्त नितीन गडकरी यांनी शनिवारी सांगितले की, 2024 पर्यंत देशाला 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट कठीण आहे, पण ते अशक्य नाही. ते एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले की, देशांतर्गत उत्पादन वाढवून आणि आयातीवरील अवलंबन कमी करुन हे लक्ष्य गाठता येते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील याबाबत अनेकदा भाष्य केलेले आहे.

फेसबुक पेज लाईक करा –