PPF, NSC आणि सुकन्या समृद्धी योजनांसहित लहान बचत योजनांबद्दल सरकारचा मोठा निर्णय ! जाणून घ्या व्याजदर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   केंद्र सरकारनं बुधवारी PPF, NSC आणि सुकन्या समृद्धी योजना (sukanya samriddhi) अशा लहान बचत योजनांबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. सरकारनं या लहान बचत योजनांच्या व्याजात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. वित्त मंत्रालयातील आर्थिक प्ररणातील सचिव तरुण बजाज यांनी या गोष्टीची माहिती दिली आहे. या (sukanya samriddhi) निर्णयामुळं ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीसाठी मिळणाऱ्या व्याजदरात कोणताही बदल होणार नाही.

अर्थ मंत्रालय स्मॉल सेव्हींग्स स्कीम्सवरील व्याजदराबद्दल प्रत्येक 3 महिन्यांनंतर निर्णय घेत असतं. यानंतरच याचं नोटीफिकेशन दिलं जातं. ही सलग तिसरी वेळ आहे की, व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. वित्त मंत्रालयाच्या नोटीफिकेशन्सनुसार, आर्थिक वर्ष 2020-21 च्या तिसऱ्या तिमाहीसाठी छोट्या बचत योजनांवरील व्याजदर समान राहिल.

स्मॉल सेव्हींग्स वरील व्याज दर पुढील प्रमाणेच मिळत राहणार आहे.

–  सुकन्या समृद्धी योजना – 7.6 %

–  पब्लिक प्रॉव्हीडंट फंड (पीपीएफ) – 7.1 %

–  नॅशनल सेव्हींग्स सर्टीफिकेट (एनएससी) – 6.8 %

–  5 वर्षांसाठी सीनियर सिटीझंस स्कीम्सवर 7.4 % दरानं व्याज मिळणार आहे. या स्किममध्ये व्याजदर तिमाही आधारावर ठरवला जातं.

–  नॅशनल सेव्हींग्स रिकरींग अकाऊंट – 5.8 %

–  किसान विकास पत्र (केव्हीपी) – 6.9 %. हे तिमाही आधारावर दिलं जातं.