परीक्षेवेळी झाला मृत्यू, ३ विषयात मिळाले पैकीच्या पैकी मार्क

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्टीफन हॉकिंगला आपला आदर्श मानणाऱ्या दिल्लीतील एका विद्यार्थ्याचा परीक्षा देत असतानाच मृत्यू झाला, मात्र विनायक श्रीधरने मृत्यूआधी दहावीच्या ज्या ३ विषयांची परीक्षा दिली त्यामध्ये त्याने प्रत्येक विषयात १०० मार्क मिळवले आहेत.

विनायकला इंग्रजी विषयामध्ये १०० मार्क पडले. विज्ञानात ९६ आणि संस्कृतमध्ये त्याने ९७ मार्क त्याला पडले. कम्प्युटर सायन्स, सोशल स्टडी या विषयाची परीक्षा मात्र त्याला देता आली नाही. १० वीच्या परीक्षेत पहिला येणे, अंतराळात जाणे हे त्याचे स्वप्न होते. पण आता ते पूर्ण होऊ शकणार नाही. विनायक जेव्हा २ वर्षांचा होता तेव्हा त्याला मस्क्यूलर डिस्ट्रॉफी या आजाराने ग्रासलं होतं. या आजारांमध्ये मांसपेशींची वाढ होत नाही. त्यामुळे शरीर कमकुवत होतं. या आजारामुळे विनायक कमजोर पडला होता. विनायक नॉएडाच्या एमिटी शाळेमध्ये शिकायचा.

दरम्यान, विनायकने आयुष्याबद्दल खूप स्वप्ने बघितली होती, मात्र आता ती पूर्ण होणार नाहीत. महान वैज्ञानिक हॉकिंग यांच्यासारखं त्याचं आयुष्य व्हिल चेअरवर सुरू होतं. मात्र, त्याच्या आजाराने त्याला साथ दिली नाही आणि आता त्याची सगळी स्वप्न अपूर्ण राहिली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like