बुरखा परिधान करणाऱ्या सर्वच महिला दहशतवादी नसतात : रामदास आठवले

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतात बुरखा तसेच नकाब वर बंदी आणण्याच्या मागणीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी याला विरोध केला आहे. बुरखा परिधान करणारी प्रत्येक महिला दहशतवादी नसते, असं आठवलेंनी म्हटलं आहे.

‘आठवले म्हणाले कि ,बुरखा परीधान करणाऱ्या सर्वच महिला दहशतवादी नसतात. ज्या महिला दहशतवादी आहेत, त्यांचा बुरखा हटवण्यात आला पाहिजे. पण बुरखा परिधान करणं ही एक परंपरा आहे आणि त्यांचा तो अधिकार आहे, त्यामुळे देशात बुरख्यावर बंदी आणली जाऊ नये’,असं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलय. यामुळे त्यांनी उद्धव ठाकरेंच्या मागणीला विरोध केला कि काय यावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशात बुरखा किंवा नकाब यावर देशात बंदी घालावी अशी मागणी केली आहे. उद्धव यांनी सामना संपादकीयद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे याबाबतची मागणी केली आहे.त्यात त्यांनी म्हटले कि ,’बुरखा घातल्यामुळे चेहरा झाकला जातो अशा व्यक्ती राष्ट्रीय आणि सामाजिक सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात.

नुकतेच श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल यांनी श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे बुरखा बंदी केली आहे त्यावर उद्धव म्हणाले कि ,रावणाच्या लंकेत जे घडले ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार? पंतप्रधान मोदी यांचीं आज अयोध्येत प्रचार सभा आहे , म्हणूनच अशी विचारणा त्यांनी पंतप्रधान मोदींना केली आहे.