वेगानं पृथ्वीच्या दिशेनं येतोय ‘महाकाय’ ‘धूमकेतू’, 27 मे रोजी इथून पाहणं शक्य

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मागच्या महिन्यात 29 एप्रिलला महाकाय लघुग्रह म्हणजेच अ‍ॅस्टेरॉईड पृथ्वीवर आदळण्याचे संकट टळले होते. आता पुन्हा अशाच प्रकारची एक खगोलीय घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतु, यावेळेस हा लघुग्रह नसून महाकाय धुमकेतू म्हणजेच कॉमेट असून तो पृथ्वीच्या दिशेने वेगाने येत आहे. तो सूर्याकडून पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. मे च्या अखेरपर्यंत तो पृथ्वीच्या खुप जवळ येईल. नासाचे अधिकृत ट्विटर हँडल नासा सन अ‍ॅण्ड स्पेस आणि नासा अ‍ॅस्टेरॉईड वॉच वर ही माहिती देण्यात आली आहे. या माहितीनुसार हा धुमकेतू 27 मे 2020 रोजी पृथ्वीच्या खुप जवळ असणार आहे. तो पृथ्वीवरून पाहता येईल. धुमकेतू पाहणे ही एक दुर्लभ घटना आहे. कारण अनेक वर्षानंतर अशाप्रकारची घटना घडत असते.

कॉमेट स्वान नावाचा हा धुमकेतू शेपटी असलेल्या तार्‍याप्रमाणे आपल्या मागे अनेक मैल लांब धुळ, दगडाचे तुकडे, गॅस, बर्फ, स्पेस डेब्रीजचे कण इत्यादी घेऊन येत आहे. सूर्याच्या प्रकाशात तो येताच चमकू लागतो. परंतु, धुमकेतू अ‍ॅस्टेरॉईडप्रमाणे घातक किंवा नुकसानदायक नसतो, मात्र तो पृथ्वीच्या वातावरण दाखल झाल्यानंतर निर्माण होणार्‍या प्रभावाबाबत काहीही स्पष्ट सांगता येत नाही.

सामान्यपणे आलेले छोट्या आकाराचे धुमकेतू पृथ्वीच्या कक्षेत घुसताच जळून खाक होतात. ही घटना आकाशात आपल्याला एखादा तारा तुटल्याप्रमाणे दिसते. 27 मे रोजी पृथ्वीच्या जवळ येणार्‍या या धुमकेतूचा परिणाम आकाशावर दिसून येऊ शकतो. याच्यामुळे आकाशाचा रंग हिरवा होईल, जो एक रोमांचकारी अनुभव असेल.

या धुमकेतूच्या काही खास गोष्टी

– या स्वॉन धुमकेतूची शेपूट लाखो मैल लांब आहे, जी खगोलप्रेमींसाठी आणि अंतराळप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र असणार आहे.

– तो थेट डोळ्यांनी, टेलिस्कोप न वापरताही दिसून शकतो. मात्र, याकाळात एखादा अन्य धुमकेतू किंवा इतर वस्तूला तो धडकता कामा नये.

– सध्या तो पृथ्वीपासून 53 मिलियन म्हणजे 4 अरब 2 करोड 77 लाख 3 हजार 200 मैल दूर आहे. ज्या वेगाने तो पृथ्वीच्या दिशेने येत आहे, त्यानुसार तो 27 मेपर्यंत पृथ्वीवर आदळू शकतो.

– ब्रिटनसह अनेक युरोपीय देशात तो सायंकाळी दिसू शकतो. आशियाई देशांमध्ये तो इस्टर्न टाइम झोननुसार सकाळी दिसू शकतो.

– अंतराळ संशोधकांचे म्हणणे आहे की, हा धुमकेतू 11 हजार वर्षात एक वेळा पृथ्वीवर आदळतो. परंतु, याच्यामुळे कोणतीही हानी होत नाही, केवळ आकाशाचा रंग बदलून हिरवा होतो.

– 27 मे रोजी तो स्पष्ट दिसू शकतो. जर तुमच्याकडे छोटी दुर्बिण किंवा टेलीस्कोप आहे तर तो आणखी चांगला दिसू शकतो.

– सूर्यापासून तो जेवढा जवळ असेल, तेवढी त्याची चमक जास्त असेल. एखाद्यावेळी तो छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये विभागला जाऊ शकतो.

– या धुमकेतूमध्ये प्रामुख्याने बर्फ आणि मिथेन गॅस भरलेला एक भाग सूर्याला फेर्‍या मारत आहे. तो पृथ्वीच्या जवळ येण्याचे कारण म्हणजे गुरूत्वाकर्षण होय.

धुमकेतू म्हणजे काय ?

धुमकेतू किंवा कॉमेट सौरमंडलात आढणारे तारे असतात, जे मुळरूपात दगड, धुळ, बर्फ आणि गॅसपासून तयार झालेले छोटे-छोटे तुकडे असतात. ते ग्रहांसमोरच सौरमंडळात सूर्याची परिक्रमा करतात. छोटे धुमकेतू सूर्याची परिक्रमा एक अंडाकृती मार्गावर सुमारे 6 ते 200 वर्षात एकदा पूर्ण करतात. काही धुमकेतूंचा तार्‍यांचा मार्ग वलयाकार असतो आणि ते आपल्या जीवनकालात एकदाच दिसतात. मोठ्या मार्गाचे धुमकेतू नेहमी एक परिक्रमा करण्यासाठी हजारो वर्ष लावतात. बहुतांश धुमकेतू बर्फ, कार्बन डायऑक्साईड, मिथेन, अमोनिया तसेच अन्य पदार्थांसारखे सिलिकेट आणि कार्बनिक मिश्रणाचे बनलेले असतात. यांना सामान्य भाषेत शेपटीवाला तारा सुद्धा म्हटले जाते. कारण त्यांच्या पाठीमागे वरील तत्वांची लांब शेपटी बनलेली असते, जी सूर्यप्रकाशात चमकत असते.