चुकूनही करू नका LIC चे ‘हे’ काम, अन्यथा विमा कंपनी करू शकते कठोर कायदेशीर कारवाई; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था-  भारतीय आयुर्विमा महामंडळाने LIC एक अलर्ट जारी केला आहे. इन्शुरन्स कंपनीने म्हटले आहे की, विना परवानगी LOGO चा वापर करता येणार नाही. जर कुणी विमा कंपनी लोगोचा चुकीच्या पद्धतीने वापर करताना आढळून आली तर सक्त कारवाई केली जाईल. अनेक लोक आपला व्यापार वाढवण्यासाठी एलआयसी LIC च्या लोगोचा वापर करत आहेत. आता ते पुढे असे करू शकणार नाहीत, कारण असे करणे दंडणीय गुन्हा आहे.

सर्वात चांगली लस कोणती Covishield, Covaxin की Sputnik-V? जाणून घ्या एम्स संचालकांनी काय म्हटले

एलआयसीने याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. विमा कंपनीने लिहिले आहे की,
‘परवानगीशिवाय कोणतीही वेबसाइट, पब्लिशिंग मटेरियल आणि डिजिटल पोस्टमध्ये आमच्या लोगोचा वापर करता येणार नाही.’
एलआयसीने LIC म्हटले की, LOGO चा वापर करणे बेकायदेशीर आहे.
अशा लोकांच्या विरोधात सिव्हिल आणि क्रिमिनल अंतर्गत कारवाई केली जाईल.

30 जूनपूर्वी करून घ्या ‘ही’ 5 अतिशय महत्वाची कामे अन्यथा लागेल मोठा दंड, सोबतच बँक खाते आणि PAN कार्ड होईल बंद

तसेच आयुर्विमा महामंडळाने LIC आपल्या ग्राहकांना जागृत करण्यासाठी दुसरे ट्विट सुद्धा केले आहे. एलआयसीने म्हटले आहे की, बोनसशी संबंधीत माहिती कॉल करून शेयर केली जात नाही.
एलआयसीचे LIC अधिकारी कधीही फोन करून पॉलिसी नंबर, पॅन नंबर आणि नॉमिनीबाबत माहिती मागत नाहीत.

मुंबई : 11 दिवसातच झाला महिनाभरा इतका पाऊस, IMD ने रविवारपर्यंत जारी केला हाय अलर्ट

विमा कंपनीने म्हटले, जर एखादा कॉल आणि ई-मेल आला तर त्याची तक्रार नोंदवा. कम्प्लेंट [email protected] वर जाऊन करू शकता.
तर एलआयसीने आपल्या पॉलिसी होल्डरसाठी हेल्पलाईन नंबर 022-6827 6827 सुद्धा दिला आहे.

Web Title : National null lic public alert strict legal action when unauthorized use of company logo