Sunspot : पृथ्वीकडे ‘मार्गस्थ’ होवू शकतो धोकादायक सनस्पॉट, जाणून घ्या जगावर काय होईल परिणाम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   संशोधकांनी एका मोठ्या सनस्पॉटचा शोध लावला आहे, जो लवकरच पृथ्वीकडे वळू शकतो आणि त्याच्या परिणामामुळे मोठे नुकसान होऊ शकते. स्पेस वेदर डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, सनस्पॉट एआर 2770 च्या पसरण्याची आणि थेट पृथ्वीकडे वळण्याची शक्यता आहे. हा पृथ्वीकडे येण्याचा अर्थ हा आहे की, येथे महत्वपूर्ण कनेक्टिव्हिटी ठप्प होणे, जसे की वीज, मोबाइल नेटवर्क इत्यादी.

हा सनस्पॉट व्यासात 50,000 किलोमीटरपर्यत सरकला, तर तो सौर फ्लेयरमध्ये बदलेल, ज्यामुळे दळणवळण माध्यमांचे नुकसान होऊ शकते. हा पॉवर ग्रिड, सॅटेलाइट, रेडियो संपर्क, ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम (जीपीएस)ला प्रभावित करू शकतो. याचा सर्वप्रथम युनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (युएसए) मध्ये फ्लोरिडाच्या ट्रेंटनचे एक खगोलतज्ज्ञ मार्टिन वाइज यांनी शोध लावला आहे.

राष्ट्रीय सौर आणि वातावरणीय प्रशासन (एनओएए) ने म्हटले की, याचा परिणाम म्हणून एका शक्तीशाली सौर वादळामुळे अंतराळात वीजेच्या धारांचा चढ-उतार आणि पृथ्वीच्या वेगवेगळ्या चुंबकीय क्षेत्रात अडकलेले प्रोटॉन उर्जेला आणखी प्रभावित करतील.

सनस्पॉट म्हणजे काय

संशोधकांनुसार सनस्पॉट सूर्यावर तयार झालेले डार्क एरिया आहेत, जे जवळपासच्या क्षेत्रांच्या तुलनेत डागांसारखे दिसतात. सनस्पॉटमध्ये सूर्याच्या पृष्ठभागाच्या पुढे जाताना पसरण्याची क्षमता असते. यामुळे चुंबकीय क्षेत्रामध्ये अनियमितता सुद्धा समोर येऊ शकते. हे सनस्पॉट मध्यम ते जास्त वेगाने प्रवास करू शकतात आणि त्यांना सौर हालचाली म्हणून सुद्धा ओळखले जाते.

सोलर फ्लेयर काय आहे

फ्लेयर्स आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठ्या स्फोटक घटना आहेत. संशोधकांनुसार, सूर्य ज्वाला ही सूर्यावर वाढलेली ती अचानक चमक असते जी चुंबकीय क्षेत्रात परिवर्तनामुळे निर्माण होते. यामुळे एक मोठा स्फोट होऊ शकतो. या फ्लेअरमध्ये सौर वायुमंडळाच्या सर्व थरांना प्रभावित करण्याची क्षमता असते. याचे तीन प्रकार असतात – फोटोफेयर, क्रोमोस्फीयर, आणि कोरोना. संशोधकांचे म्हणणे आहे की, सोलर फ्लेयरच्या स्फोटातून एक ट्रिलियन लिटील बॉय अणूबॉम्ब पर्यंतची उर्जा तयार होऊ शकते. या नावाचा भयंकर अणूबॉम्ब 1945 च्या दुसर्‍या महायुद्धाच्या दरम्यान जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर संयुक्त राज्य अमेरिकेने टाकला होता.

मार्च 2020 मध्ये सूर्यावर हालचाल

34 दिवस शांत राहिल्यानंतर मार्च 2020 मध्ये सूर्यावर हालचाली झाल्या, त्याच्या पृष्ठभागावर एक छोटा सनस्पॉट निर्माण झाला आहे. मात्र, या सनस्पॉटमुळे सौर प्रज्वाल (सोलर फ्लेयर) होण्याची शक्यता नाही. नासाने म्हटले आहे की, नवा सनस्पॉट सूर्याच्या दक्षिण गोलार्धात तयार झाला आहे, जो खुप छोटा आहे. हा सनस्पॉट येत्या दिवसात पसरेल किंवा नष्ट होईली, मात्र सध्या याबाबत ठाम सांगता येऊ शकत नाही. जगभरातील शास्त्रज्ञ यावर लक्ष ठेवून आहेत.

11 वर्षांचे असते सोलर सायकल सत्र

सध्या सूर्य 25 व्या सोलर सायकलमधून जात आहे. त्याचे सोलर सायकल सत्र मागच्या वर्षी सुरू झाले आहे. प्रत्येक सत्र 11 वर्षांचे असते. या सत्राला सुरू होऊन अनेक महिने उलटूनही सूर्य शांत आहे. या दरम्यान काही छोट्या आकाराचे सनस्पॉट आढळले आहेत. या सोलर सायकलमध्ये सनस्पॉट निर्माण होण्याची गती खुप मंद आहे. अपेक्षा आहे की, जसजसे हे सत्र पुढे सरकेल, सनस्पॉटची संख्या वाढणे सुरू होईल. हे नवे सत्र 2030 पर्यंत चालेल. रविवारी सूर्याच्या दक्षिण गोलार्धात हा सनस्पॉट निर्माण झाला आहे. ज्यावर एरीजचे शास्त्रज्ञ लक्ष ठेवून आहेत.

यासाठी स्पेस एजन्सीज 24 तास ठेवतात नजर

सनस्पॉटचे तयार होणे सूर्याची सक्रियता दर्शवते. ज्यामधून सोलर फ्लेयर तयार होतात आणि चुंबकीय वादळे निर्माण होतात. हे वादळ पृथ्वीपर्यंत पोहचते. पृथ्वीच्या वातावरणात पसरलेल्या किमती सॅटेलाइट्ससाठी सोलर फ्लेयर खुप धोकादायक आहेत. उत्तराखंडच्या आर्यभट्ट निरिक्षण विज्ञान संशोधन संस्था एरीजचे माजी संचालक व वरिष्ठ सौर शास्त्रज्ञ डॉ. वहाबउद्दीन यांच्यानुसार सोलर फ्लेयरमधून निघणारे उच्च ऊर्जावान कण सॅटेलाइट्सला डॅमेज करू शकतात. ज्यामुळे दळणवळण सेवा बाधित होतात. या कारणामुळे जगभरातील स्पेस एजन्सीज यावर 24 तास नजर ठेवतात. याशिवाय इलेक्ट्रॉनिक व विद्युत उपकरणांसाठी सुद्धा हा मोठा धोका आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like