‘या’ पेन्शन स्कीममध्ये सरकारी आणि खासगी नोकरदारांना गुंतवणूकीचे अनेक फायदे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर पैशांची गुंतवणूक आणि बचत करण्यावर तुमचा विश्वास असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. बचत नेहमी एका योग्य वेळीच व्हायला पाहिजे जेणेकरून नंतर त्याचा फायदा होत राहील. सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला पैशांची गरज भासल्यास ही बचत कामात येईल. सेवानिवृत्ती निधी हा एक प्रभावी उपाय आहे. आज अशाच एका चांगल्या पर्यायाबद्दल जाणून घेऊया. याचे नाव एनपीएस (NPS) म्हणजेच नॅशनल पेन्शन सिस्टम आहे, जे खूप लोकप्रिय आहे. हे कसे कार्य करते आणि त्यामध्ये पैसे गुंतवण्याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊया.

नॅशनल पेन्शन सिस्टम म्हणजेच राष्ट्रीय पेन्शन योजना एखाद्या म्युच्युअल फंडाप्रमाणेच काम करते. यामुळे खूप चांगले उत्पन्न मिळते. विशेष म्हणजे एनपीएस सरकारी आणि खासगी क्षेत्रातील दोन्ही कर्मचार्‍यांसाठी प्रभावी आहे. या सेवानिवृत्ती निधी योजनेत ग्राहक त्याच्या सेवा कालावधीत दरमहा काही पैसे जमा करतात. गुंतवणूकदार सेवानिवृत्तीनंतर ठेवींमधील काही भाग काढून घेऊ शकतात. उर्वरित रकमेपैकी नियमित उत्पन्नासाठी NUT घेऊ शकतात.

एनपीएस पात्रतेसाठी ही आहे वयोमर्यादा
राष्ट्रीय पेन्शन योजनेत 18 ते 60 वर्षे वयोगटातील लोकांचा समावेश असू शकतो. एनपीएस अंतर्गत देशातील जवळपास सर्व सरकारी आणि खासगी बँकांमध्ये खाती उघडता येतात. जर ग्राहकांनी कमी वयात एनपीएस खाते उघडले तर ते त्यांच्यासाठी फायदेशीर ठरते. जर कोणत्याही कर्मचार्‍याचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे असेल तर त्याने 30 ते 35 वर्षे वय असतानाच एनपीएस खाते उघडले पाहिजे.

राष्ट्रीय पेन्शन योजना अशा प्रकारे कार्य करते
ही पेन्शन योजना म्युच्युअल फंडासारखीच आहे. ही त्याच प्रकारे ऑपरेट केली जाते. यातही 3 प्रकारच्या गुंतवणूकी आहेत. प्रथम इक्विटी, द्वितीय कॉर्पोरेट बाँड आणि तृतीय सरकारी रोखे. गुंतवणूकदारास त्याच्या गुंतवणूकीचा निर्णय घेण्यासाठी मालमत्ता वाटप (अ‍ॅसेट अलोकेशन) आणि स्वयं निवड (ऑटो चॉईस) हे दोन्ही पर्याय मिळतात. ऑटो चॉईसमध्ये सुरुवातीला इक्विटीमधील 50% हिस्सा जातो. वेळेनुसार हा कमी देखील होतो. अ‍ॅसेट अलोकेशनमध्ये गुंतवणूकदार 75 टक्क्यांपर्यंत इक्विटीमध्ये गुंतवणूक करू शकतो.

वेळेपूर्वी पैसे काढू नका
नॅशनल पेन्शन योजनेत वेळेपूर्वी पैसे काढण्याची परवानगी नसली तरी काही परिस्थितीमुळे ही सूट दिली जाऊ शकते. एनपीएस खाते उघडण्यापासून त्यानंतरच्या तीन वर्षापर्यंत कंपनीच्या निधीव्यतिरिक्त 25 टक्के रक्कम काढता येईल.

या कामांसाठी पैसे काढू शकतात
जर आपल्याला पैशांची आवश्यकता असेल तर आपण हे काम काही विशेष श्रेणीमध्ये करू शकता. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, तीव्र आजाराच्या उपचारांसाठी, घर खरेदीसाठी, घर बांधण्यासाठी, लग्न आयोजित करण्यासाठी अकाली पैसे काढणे शक्य आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की हे अकाली पैसे काढणे केवळ 5-5 वर्षांच्या कालावधीत तीन वेळा करण्यास परवानगी आहे.