Weather Alert : आगामी 24 ते 48 तासांत ‘या’ 7 राज्यात ‘मुसळधार’ पाऊस पडण्याची शक्यता, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –  13 जुलैपासून सुरु होणाऱ्या नवीन आठवड्यात भरपूर पाऊस पडणार आहे. देशातील 15 हून अधिक राज्यात पाऊस पडण्याची प्रक्रिया सुरू होईल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. हा पाऊस दक्षिण ते मध्य, उत्तर-पूर्व, उत्तर भारतातील राज्यात अनुक्रमे सुरु राहील. काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील पडू शकतो. 15 जुलैपर्यंत पूर्व भारतात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासांत जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणाच्या काही भागांत हलक्या ते मध्यम पावसाची नोंद झाली. हवामान खात्याने आपल्या अंदाजानुसार ऑरेंज अलर्ट जारी केला असून, काही ठिकाणी मुसळधार पाऊस व मेघगर्जनेचा अंदाज वर्तविला आहे. स्कायमेट वेदरनुसार काही राज्यात हलका ते मध्यम पाऊस पडेल. पुढील 24 ते 48 तासांत हवामान कुठे कसे असेल हे जाणून घ्या.

येत्या 24 तासांत या राज्यात होईल पाऊस

येत्या 24 तासांच्या दरम्यान जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश, उर्वरित मध्य प्रदेश, दक्षिण छत्तीसगढ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, अंतर्गत कर्नाटक येथे हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचप्रकारे बिहारचे तराई क्षेत्र, ईशान्य भारत, झारखंड, उत्तर ओडिशा, उत्तर छत्तीसगड, ईशान्य मध्य प्रदेश, गुजरात, कोकण गोवा, उत्तर पंजाब, हरियाणा येथे हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तामिळनाडू आणि पूर्व राजस्थानात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे तर गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छमध्ये एक-दोन ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या 7 राज्यात मुसळधार पाऊस

येत्या 24 तासांत उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, हिमाचल प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश आणि किनारी कर्नाटकात मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू राहील. याचा परिणाम येथील सार्वजनिक जीवनावर होऊ शकतो.

पुढील 12 तासांत या शहरांमध्ये बदलेल हवामान

महाराष्ट्रात येत्या 6-8 तासांत भंडारा, गोंदिया, लातूर, कोल्हापूर, नागपूर, रायगड, रत्नागिरी, सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेगवान वाऱ्यासह पाऊस व गडगडाटीसह अधून मधून पाऊस पडेल. त्याचप्रमाणे कर्नाटकातही येत्या 6 तासात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडू शकतो. याचा परिणाम बागलकोट, बेळगाव, बिदर, विजापूर, धारवाड, गडग, गुलबर्गा, हावेरी, कोप्पल, रायचूर, शिमोगा, उत्तर कन्नड आणि यादगीर या जिल्ह्यांवर होणार आहे.