Weather Alert : 28 मे च्या रात्रीपर्यंत ‘या’ राज्यांमध्ये मुसळधार पाावसाची शक्यता, रहा अलर्ट

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – देशात सध्या उष्णतेचा कहर सुरू आहे. परंतु, यादरम्यान पावसाची शक्यता सुद्धा आहे. मान्सून पूर्व पाऊस मागील दोन दिवसांपासून काही राज्यात वादळी वार्‍यासह सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे की, पुढील 12 तासात काही शहरात पाऊस पडू शकतो, तर स्कायमेट वेदरच्या अंदाजानुसार येत्या 24 तासात अनेक शहरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. हा पाऊस कुठे होणार आहे, ते जाणून घेवूयात.

– पुढील 24 तासादरम्यान पश्चिम बंगालमध्ये बिहारच्या काही भागात हवामान बदलेल. झारखंडच्या पूर्व भागात पावसाची शक्यता आहे. याशिवाय उत्तर प्रदेश आणि ओडिसामध्ये काही ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो.

– स्कायमेटनुसार राजस्थानच्या लोकांसाठी खुशखबर आहे की, लवकरच गरमीच्या संकटातून त्यांची सुटका होणार आहे. सांगितले जात आहे की, आता लवकरच राजस्थानमधील हवामान बदलणार आहे, पाऊस पडेल, तापमानात घसरण होईल, ज्यामुळे उकड्यापासून दिलासा मिळेल.

– पुढील 24 तासांच्या दरम्यान पूर्वत्तर भारतात हवामान वेगाने बदलू शकते. येथे अनेक भागात जोरदार पावसाची हालचाली होऊ शकतात. पूर्वत्तर राज्यांत अनेक ठिकाणी मुसळधार पावसासह जोरदार वारे वाहतील.

– पुढील 24 तासादरम्यान मध्यवर्ती तामिळनाडुमध्ये दोन ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो. तर उत्तर भारतात डोंगरांवर एक-दोन ठिाकणी पाऊस होण्याची शक्यता आहे.

– पुढील 24 तासादरम्यान केरळ, दक्षिण कर्नाटक आणि तटीय आंध्र प्रदेशच्या काही भागात हलका ते मध्यम पावसासह काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो.

– हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे की, 29 मेपासून उत्तर राजस्तानच्या त्याच भागांमध्ये पाऊस सुरू होईल जेथे तापमान सर्वात जास्त नोंदले गेले आहे. यानंतर येथे हळुहळु राजस्थानच्या मध्य आणि दक्षिण तथा पूर्व जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊसाच क्रम सुरू होईल.

– पुढील 24 तासादरम्यान पूर्व आणि पूर्वोत्तर भारतात आसाम, मेघालय आणि अरूणाचल प्रदेशात पाऊस थोडा कमी होईल. परंतु, मणिपुर, मिझोरम आणि त्रिपुरात पावसाची तीव्रता वाढू शकते.

तापमानाबाबत हे आहेत अपडेट

राजस्थानचा चुरू पिछले अनेक दिवसांपासून देशातील सर्वात उष्ण शहर म्हणून वरच्या स्थानी आहे. आज नवी रेकॉर्ड बनला कारण पारा 50 50 डिग्री सेल्सियस पर्यंत पोहचला आहे. दिल्ली एनसीआरसाठी हीट वेव अलर्ट आहे. राजस्थानसाठी हीटवेव अलर्ट आहे. येथे 28 मे 2020 पर्यंत काही जिल्ह्यात तापमान गंभीर स्थितीत राहू शकते. राजस्थानच्या उत्तर आणि पश्चिम जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तासात म्हणजे 28 मे पर्यंत अशाच प्रकारे उष्णतेचे विक्राळ रूप दिसेल.

हवामान विभागानुसार बंगालच्या खाडीत मान्सून पुढे सरकत आहे. परंतु उत्तर-पश्चिममध्ये कोरड्या हवेमुळे उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात तापमान अनेक ठिकाणी वाढू शकते. विशेष करून पश्चिम राजस्थान आणि विदर्भात स्थिती खुप बिघडू शकते. याशिवाय हरियाणा, चंडीगढ़, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान आणि बिहार, पंजाब, झारखंड, ओडिसाच्या काही भागात तापमान वाढण्याची शक्यता आहे.