Weather Update : 18 सप्टेंबरला महाराष्ट्रासह ‘या’ 9 राज्यात जोरदार पावसाची शक्यता, जाणून घ्या देशातील हवामानाची स्थिती

नवी दिल्ली : देशात सध्या मान्सूनचे विविध रंग दिसून येत आहेत. काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे, तर काही ठिकाणी उष्णतेने लोक त्रस्त आहेत. मागील 24 तासात तमिळनाडु, झारखंड, गुजरात आणि दक्षिण राजस्थानमध्ये काही ठिकाणी तुरळक पाऊस आणि एक ते दोन ठिकाण मध्यम पाऊस झाला. उत्तराखंडमध्ये सुद्धा एक-दोन ठिकाणी तुरळक पाऊस झाला. कमी दाबाचा पट्टा पुढे सरकत तेलंगना आणि दक्षिण छत्तीसगढवर पोहचला आहे. या सिस्टमच्या सोबतच एक चक्री वादळीवार्‍याचा पट्टासुद्धा पुढे सरकत आहे.

हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे की, पुढील 24 तासात अनेक राज्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो. जाणून घेवूयात देशात कुठे कसे असेल हवामान…

पुढील 24 तासांचा हा आहे अंदाज

– आसाम, मेघालय, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगना, उत्तर कर्नाटक, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊसासह काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो.

– अंदमान आणि निकोबार बेट, बिहार, पूर्व उत्तर प्रदेशचा काही भाग, दक्षिण मध्य प्रदेश, दक्षिण छत्तीसगढ, महाराष्ट्र, केरळ, गुजरातमध्ये हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो.

– तमिळनाडुचा काही भाग, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, ओडिसा, झारखंड आणि दक्षिण-पूर्व राजस्थानच्या काही भागात हलका पाऊस होऊ शकतो. एक-दोन ठिकाणी मध्य पावसाची शक्यता आहे.

– पश्चिम राजस्थान आणि उत्तराखंडमध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.