National Nutrition Week 2021 | ‘या’ 8 गोष्टींमध्ये सर्वात जास्त पोषकतत्व, तुम्ही देखील खाण्यास सुरूवात करा; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  National Nutrition Week 2021| दरवर्षी 1 सप्टेंबरपासून 7 सप्टेंबरपर्यंत ’नॅशनल न्यूट्रिशन वीक’ (National Nutrition Week 2021) साजरा केला जातो. तो साजरा करण्याचा हेतू, लोकांना चांगली पोषकतत्व आणि त्याचे फायदे समजावेत. निरोगी शरीरासाठी शरीरात सर्व आवश्यक पोषकतत्व असणे आवश्यक आहे. अशा 8 वस्तू कोणत्या ते जाणून घेवूयात…

सालमन फिश – Salmon Fish

सर्व मासे एकाच प्रकारची पोषकतत्व देत नाहीत. सालमन आणि इतर फॅटी फिशमध्ये भरपूर ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड असते. 100 ग्रॅम सालमनमध्ये 2.8 ग्रॅम ओमेगा-3, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी असते. आठवड्यात एकवेळ तरी सेवन करा.

लसून – Garlic

लसून मध्ये व्हिटॅमिन सी, बी1 आणि बी6, कॅल्शियम, पोटॅशियम, कॉपर, मँगेनीज आणि सेलेनियमची मात्रा जास्त असते. सल्फर घटकही असतो. यातील एलिसिन हाय ब्लड प्रेशरसह बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते. हृदयरोग, कॅन्सरचा धोका कमी होतो.

बटाटा – Potatoes

एका मोठ्या बटाट्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयर्न, कॉपर आणि मँगेनीज भरपूर असते. व्हिटॅमिन सी आणि बी असते.

ब्लूबेरी – Blueberries

ब्लूबेरीत कॅलरी कमी परंतु व्हिटॅमिन, मिनरल्स आणि एंथोसायनिनसारखी अँटीऑक्सीडेंट भरपूर असतात. रक्त पुरवठा सुरळीत होतो. गंभीर आजार दूर होतात.

अंड्याचा बलक – Egg yolk

अंड्याचा बलक सर्वात जास्त पोषक आहे. संपूर्ण अंडे मल्टी व्हिटॅमिनने भरलेले असते. ल्यूटिन, जेक्सॅन्थिनसारखे अँटीऑक्सिडेंट असतात, जी डोळ्यांचे रक्षण करतात. मोतीबिंदूचा धोका कमी होतो. यात प्रोटीन आणि हेल्दी फॅट असते.

 

डार्क चॉकलेट – Dark Chocolate

हाय कोको असलेल्या डार्क चॉकलेटमध्ये सर्वात जास्त पौष्टिक पदार्थ आढळतात. हे फायबर, आयर्न, मॅग्नेशियम, कॉपर आणि मँगेनिजने भरपूर असते. याचे असंख्य आरोग्यदायी फायदे आहेत.

धान्य – Grain

धान्यात फॅट खुप कमी असते परंतु हे फायबर आणि कार्बोहयड्रेटयुक्त असते. आहारात ओट्स, धान्याचा पास्ता, ब्रेड, ब्राऊन राईस, जव, क्विनोआ, मका आणि गव्हाची चपाती, यांचा समावेश करा.

बीन्स – Beans

बीन्समध्ये विरघळणारे फायबर्स आढळते जे हृदयासाठी खुप चांगले असते. हे शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल कमी करते. यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडेंट तत्व असते. प्रोटीनची मात्रासुद्धा इतर भाज्यांच्या तुलनेत जास्त असते.

 

Web Title : National Nutrition Week 2021 | national nutrition week 2021 most nutrient dense foods

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

UGC NET Exam Dates | NTA ने बदलली यूजीसी नेट परीक्षेची तारीख, जाणून घ्या नवीन शेड्यूल

Rain in Maharashtra | आगामी 4 दिवस पुण्यात मुसळधार; 15 जिल्ह्यांना आज ‘Alert’

Sangli Crime | धडक करावाई ! नशेबाज तरुणांना नशेच्या गोळ्यांचा पुरवठा करणाऱ्या मेडिकलवर पोलिसांचा छापा