National Nutrition Week 2021 | 20 ते 30 वयोगटातील तरूण-तरूणींनी आवश्य खाव्यात ‘या’ गोष्टी, वयाच्या हिशेबाने जाणून घ्या बेस्ट डाएट

नवी दिल्ली : National Nutrition Week 2021 | एक वर्षाच्या वयापासून आपली बॅलन्स डाएटची आवश्यकता सुरू होते. आपण किती वर्ष जीवित राहू शकतो हे यावर अवलंबून आहे की आपण कोणत्या प्रकारचा आहार घेत आहोत. व्यक्तीने कोणत्या वयात कोणत्या प्रकारचा आहार (National Nutrition Week 2021) घेतला पाहिजे ते जाणून घेवूयात…

 

मुलांनी काय खाल्ले पाहिजे –

मुलांच्या विकासासाठी त्यांना प्रोटीन अणि आवश्यक फॅटी अ‍ॅसिडची आवश्यकता असते, जी मेंदूच्या विकासाला मदत करते. तज्ज्ञांनुसार, यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, झिंकसारखी आवश्यक मिनरल असावीत, कारण किशोरावस्थेत पोहचण्यासाठी शरीराचा योग्य विकास होणे आवश्यक आहे.

 

मुलांसाठी आहार –

मुलांना जेवणासाठी आकर्षित करण्यासाठी त्यांच्या प्लेटमध्ये वेगवेगळ्या रंगाची फळे आणि भाज्या ठेवा. कोबी, हिरवी चटणी आणि पनीर टाकून एक पिनव्हील सँडविच बनवता येऊ शकते, ज्यामध्ये ते सर्वकाही असेल ज्याची मुलांना आवश्यकता असते. तज्ज्ञ सांगतात, पोषकतत्व युक्त भरपूर रोल्स आणि पॅटीस मुलांना देऊ शकता.

 

20-40 वयोगटातील लोकांनी काय खावे –

वाढत्या वयात शरीर निरोगी आणि आजारांना रोखणारा आहार असावा. या काळात पुरुष आणि महिलांच्या वेगवेगळ्या पोषणसंबंधी आवश्यकता असतात. महिलांना आयर्नची जास्त आवश्यकता असते.

तज्ज्ञांनुसार, महिलांमध्ये प्रेग्नंसी आणि लेक्टेशनचा टप्पा असतो जिथे विविध पोषकतत्व आणि मायक्रोन्यूट्रिएंट्सची आवश्यकता असते. त्यांना जास्त प्रोटीन, फॅटी अ‍ॅसिड, कॅल्शियम, फॉस्फोरस, आयर्न आणि फोलिक अ‍ॅसिडची आवश्यकता असते. पुरुषांना शारीरिक हालचालीमुळे ऊर्जेची आवश्यकता जास्त असते.

40 च्या नंतर लोकांनी काय खावे – चाळीशीनंतर शरीरात मेटाबॉलिक परिवर्तन होते. यानुसार पोषणसंबंधी गरजा बदलतात. आहारात चांगले फायटोन्यूट्रिएंट्स, चांगल्या अँटीऑक्सीडेंटचा वापर केला पाहिजे. पचनक्रिया ठीक ठेवण्यासह प्रतिकारशक्ती वाढवली पाहिजे.

हार्मोनल परिवर्तनामुळे या वयात ऑस्टियोपोरोसिस, हाय ब्लड प्रेशर आणि हृदयरोगांचा धोका वाढतो.
हे आजार दूर ठेवण्यासाठी पोषकतत्व युक्त बॅलन्स डाएट घ्यावा.
यावेळी मूड स्विंग सुद्धा होते. अशावेळी नट्सचा आहारात समावेश करा. फळे आणि भाज्या खा.
अवोकाडो, बेरीज आणि हिरव्या पालेभाज्या खा.

 

ज्येष्ठांसाठी भोजन (60 पेक्षा जास्त) –

या वयात व्यक्तीचे शरीर कमजोर होऊ शकते आणि पहिल्या प्रमाणे दिवसेंदिवस हालचाली करण्यात असमर्थता होऊ शकते.
काही लोकांना आपले जेवण स्वता तयार करण्यात अडचण येते.
काही लोकांना दातांची समस्या असल्याने चावता येत नाही. यामुळे पचनाच्या समस्या होतात.

या वयात प्रोटीनचे सेवन कमी झाल्याने मांसपेशींची हानी होऊ शकते.
प्रोटीनच्या कमतरतेमुळे फ्रॅक्चरचा धोका वाढतो.
प्रोटीनसह हाडे मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमचा डाएटमध्ये समावेश करा.
सूप किंवा भाज्या आणि डाळ एकाचवेळी घ्या.
नाचणी कॅल्शियमचा चांगला सोर्स असल्याने हे पीठात मिसळू शकता.

Web Title : National Nutrition Week 2021 | national nutrition week food according to age childhood to old age

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Hinjawadi Crime | एटीएम बसवण्याच्या बहाण्याने 70-80 जणांची फसवणूक, कंपनीच्या डायरेक्टरसह 3 जणांविरुद्ध FIR

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 166 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Chakan Crime | जुगार अड्यावर चाकण पोलिसांचा छापा, जागा मालकासह 10 जणांवर FIR