आतापर्यंत तबलिगी जमातच्या 25500 सदस्यांना ‘क्वारंटाईन’मध्ये पाठवलंय, केंद्र सरकारनं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय गृह मंत्रालयाने सोमवारी सांगितले की देशात आतापर्यंत 25,500 सदस्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की हरियाणाची पाच गावं सील केली आहेत कारण या परिसरात तबलिगी जमातचे सदस्य थांबले होते. त्यांनी सांगितले की आतापर्यंत विदेशातील एकूण 2,083 तबलिगींपैकी 1,750 ना ब्लॅकलिस्ट करण्यात आले आहे.

मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले की केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे दिशानिर्देश जारी केले आहे जेणेकरुन कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारात कमतरता येणार नाही.

मंत्रालयाने सांगितले की सर्व रुग्णालय आणि संबंधित कर्मचारी यांनी वेळोवेळी आवश्यकता सांगावी जेणेकरुन ऑक्सिजनच्या पुरवठ्यात कमतरता येणार नाही.

केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार तबलिगी जमात संबंधित संक्रमणाची प्रकरणं समोर आली नसती तर देशात एकूण वाढणाऱ्या रुग्णांची संख्या अर्धी असती. भारतात यावेळी कोरोना रुग्णांच्या एकूण संख्या दुप्पट होण्यासाठी 4.1 दिवसांचा वेळ लागला आहे, परंतु सरकारच्या मते तबलिगी जमातची घटना झाली नसती तर रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी 7.4 दिवसांचा कालावधी लागला असता. आवाहलानुसार, देशातील कोरोनाग्रस्तांची संख्येतील अधिक करुन प्रकरण तबलिगी जमातशी संबंधित आहे. परंतु अद्याप सरकारकडून अद्याप कोणतीही संख्या समोर आलेली नाही.

सरकारने सांगितले की लॉकडाऊनमुळे रुग्णांची संख्या नियंत्रित आहे आणि व्हायरस संक्रमण आतापर्यंत कम्युनिटी ट्रांसमिशनच्या स्तरावर पोहोचले नाही. परंतु तबलिगी जमातच्या संमेलनामुळे कोरोना संक्रमणाची प्रकरणं वाढताना पाहून दोन उच्च न्यायालयाने कठोर शब्दात सुनावले. गुजरात उच्च न्यायालने सांगितले की वीजा नियमांचे उल्लंघन करुन दिल्ली च्या निजामुद्दीनमध्ये संमेलनात सहभागी विदेशींच्या विरोधात सक्त कारवाई झाली पाहिजे.