National Pension Scheme | पेन्शनधारकांसाठी मोठी खुशखबर ! आता NPS मधून पूर्ण पैसे काढू शकता, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी येत आहे. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) ने नॅशनल पेन्श सिस्टम (National Pension Scheme) च्या सबस्क्रायबर्सला आपले पूर्ण पैसे काढण्याची परवानगी दिली आहे. म्हणजे आता NPS सबस्क्रायबर्स पेन्शन खात्यातून पूर्ण रक्कम काढू शकतील. पीएफआरडीएनुसार, ज्या सबस्क्रायबरची एकुण पेन्शन कॉर्पस 5 लाख रुपये किंवा यापेक्षा कमी आहे, ते एन्युटी खरेदी न करता आपले पूर्ण पैसे काढू शकतात. good news for nps subscribers now nps withdrawal rules entry age eased

आता काय आहे नियम ?

सध्या पेंशन फंड दोन लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याच्या बाबतीत फंडधारक रिटायर होणे किंवा 60 वर्षाचे वय पूर्ण झाल्यावर कमाल 60 टक्के रक्कम एकरक्कमी काढू शकतात. पीएफआरडीने म्हटले आहे की जर फंडातील रक्कम पाच लाख रुपयांपेक्षा कमी आहे तर फंडधारक ती पूर्ण काढू शकतो, त्यांना विमा योजना खरेदी करण्याची आवश्यकता नाही, म्हणजे सेवानिवृत्तीच्या वेळी किंवा 60 वर्षाचे वय झाल्यानंतर 2 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम असलेल्या एनपीएस खातेधारकांना अनिवार्य आधारावर विमा कंपन्यांकडून विमा खरेदी करावा लागणार नाही.

पीएफआरडीने हे सुद्धा म्हटले की, पेन्शन फंडातून वेळेपूर्वी एकरकमी पैसे काढण्याची मर्यादा सुद्धा सध्याच्या एक लाख रुपयांवरून वाढवूनन अडीच लाख करण्यात आली आहे. तर, नॅशनल पेन्शन सिस्टम म्हणजे एनपीएसध्ये सहभागी होण्याची कमाल वयोमर्यादा आता 70 वर्ष आणि काढण्याची मर्यादा 75 वर्ष करण्यात आली आहे.

काय आहे नॅशनल पेन्शन सिस्टम ?

नॅशनल पेन्शन स्कीम (National Pension System) विशेषता रिटायर्मेंटसाठी डिझाईन केलेले दिर्घ कालावधीचे इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट आहे. याची देखरेख पेन्शन फंड नियामक पीएफआरडीए करते. नॅशनल पेन्शन सिस्टमची स्कीम-ई ने इक्विटी बाजाराला मोठा फायदा दिला आहे. मागील एक वर्षात सरकारच्या पेन्शन योजनेने 60 टक्केपर्यंतचा रिटर्न दिला आहे.

ऑनलाइन उघडू शकता एनपीएस

स्टेप 1. ई-एनपीएस पोर्टल (https://enps.nsdl.com/eNPS/NationalPensionSystem.html) वर जा.

स्टेप 2. आता National Pension System आणि यानंतर Registration पर्यायावर क्लिक करा.

स्टेप 3. आता New Registration मध्ये खात्याचा प्रकार निवडा. नंतर भारतीय नागरिक, एआरआय किंवा ओसीआयपैकी एक पर्याय निवडा.

स्टेप 4. आता Register With पैकी Aadhaar Online/Offline KYC पर्यायाची निवड करा. आता यानंतर Tier types पैकी Tier I only पर्यायाची निवड करा.

स्टेप 5. आता 12 अंकाचा आधार किंवा 16 अंकी व्हर्च्युअल आयडी नोंदवा आणि नंतर जनरेट ओटीपीवर क्लिक करा.

स्टेप 6. आता प्राप्त झालेला ओटीपी नोंदवा.

स्टेप 7. यशस्वी पडताळणीनंतर तुमची माहिती जसे की, नाव, लिंग, जन्म तारीख, पत्ता, फोटो, आधारकार्ड रेकॉर्डमधून घेतले जाईल.

स्टेप 8. आता एनपीएस नोंदणी प्रोसेससाठी दुसरी मागितलेली माहिती नोंदवा.

स्टेप 9. आता पहिले एनपीएस योगदान द्यावे लागेल आणि ओटीपी नोंदवावा लागेल. यासोबतच तुमचे एनपीएस खाते उघडले जाईल.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : National Pension Scheme | good news for nps subscribers now nps withdrawal rules entry age eased

हे देखील वाचा

Karnala Bank Scam | कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ED कडून अटक

Anti-Corruption Bureau | 40 हजाराची लाच घेणारा सरपंच ACB जाळ्यात; आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा

योगी सरकारचा मोठा निर्णय ! ज्येष्ठाला मारहाण व दाढी कापण्याच्या प्रकरणाला वेगळं वळण; ट्विटरसह 9 जणांवर FIR, धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप

कोरोनाने संक्रमित लोकांवर व्हॅक्सीनचा वेगळा परिणाम, शास्त्रज्ञांनी दिला ‘हा’ सल्ला

राज्यातील ‘या’ 6 जिल्ह्यांत कोरोनाचा धोका कायम; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा