National Pension Scheme (NPS) | निवृत्तीनंतर दरमहा मिळेल 22 हजार रुपये पेन्शन; जाणून घ्या सरकारी योजना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – National Pension Scheme (NPS) | निवृत्तीनंतर देखील तुम्हाला पैशाच्या संदर्भात कुठलीही समस्या निर्माण होऊ नये असे वाटत असले तर त्यासाठी भविष्याचा पर्याय शोधला जाणे महत्वाचे आहे. ज्यावेळी तुम्ही नोकरी करत असाल त्यावेळीच तुमचा कल हा गुंतवणूकीकडे लागला असणे महत्वाचे. त्यावेळी तुम्हाला निवृत्तीनंतर पेन्शन (Pension) मिळणार आहे. म्हणजेच नॅशनल पेन्शन स्कीममध्ये National Pension Scheme (NPS) गुंतवणूक करणे सोपे आहे. तसेच, एक सुरक्षित पर्याय आणि चांगला परतावा यातून दिला जातो. म्हणून अनेकजण नोकरदार वर्ग नॅशनल पेन्शन स्कीम अर्थात NPS मध्ये गुंतवणूक करु शकतात.

 

नॅशनल पेन्शन स्कीम National Pension Scheme (NPS) ही योजना 2004 साली सुरू झाली होती. या स्कीममध्ये सर्वात आधी केवळ सरकारी कर्मचारी गुंतवणूक करू शकत होते. पण, 2009 साली ही योजना सर्वांसाठी सुरु करण्यात आली. NPS मध्ये रिटायरमेंट आधी पैसे भरावे लागतात. रिटायरमेंटवेळी 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर एकत्रित फंडचा काही भाग काढता येतो आणि उरलेले पैसे पेन्शन रूपात मिळतात. दरम्यान, यामध्ये टॅक्सचाही फायदा मिळतो. जर तुम्ही नोकरदार असाल, तर सेक्शन 80 सीसीडी (1बी) अंतर्गत तुम्ही NPS -+मध्ये गुंतवणूक करून वार्षिक 50 हजार रुपयांची टॅक्स सूट मिळवू शकता. ही सूट 80 सी अंतर्गत मिळणाऱ्या 150000 लाख रुपयांहून वेगळी आहे.

हे करु शकतात गुंतवणूक –
18 ते 65 वर्षांची कोणतीही व्यक्ती NPS मध्ये गुंतवणूक करू शकते. NPS मधील गुंतवणूक पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीद्वारे Pension Fund Regulatory & Development Authority (PFRDA) नियुक्त केलेल्या पेन्शन फंड मॅनेजर कडून व्यवस्थापित केले जातात.
PFRDA ही राष्ट्रीय पेन्शन योजनेची नियामक आहे.
तुम्ही एकूण 7 पेन्शन फंड मॅनेजर्सपैकी कोणत्याही एकाची निवड करू शकणार आहात.
पेन्शन फंड मध्ये 60 वर्षांपर्यंत गुंतवणूक केली जातेय. त्यानंतर 1 NPS Annuity Plan घ्यावा लागतो.
6 Annuity Providers पैकी कोणताही 1 Annuity Plan खरेदी करता येतो.
वार्षिकी प्रदाते (Annuity Providers) तुम्हाला प्रति महिना पेन्शन दिले जाणार आहे.

 

दरम्यान, तीस वर्षांचा व्यक्ती दर महिन्याला 5 हजार रुपये NPS मध्ये गुंतवणूक करत असेल, तर तो निवृत्तीनंतर दर महिन्याला 22,279 रुपये पेन्शन मिळवू शकतो.
5 हजार रुपये वयाच्या 60 वर्षांपर्यंत दर महिन्याला जमा करावे लागतील.
तसेच, 45 लाख रुपये अशी एकत्रित रक्कम मिळणार आहे.
या रकमेसाठी वर्षाला 10 टक्के व्याज आणि 6 टक्के वार्षिकी दर ठरवण्यात आलाय.

 

Advt.

Web Title :- National Pension Scheme (NPS) | what is nps national pension scheme know its benefits after government pension plan

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा