दरमहा फक्त 5 हजार बचत करून मिळवा 45 लाख, सोबतच मिळणार 22 हजाराची पेन्शन अन् IT मध्ये सूट, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – शक्यतो अनेक लोक निवृत्तीनंतरच्या बचती संबंधित खूपच चिंतीत असतात, परंतू तुम्ही नॅशनल पेंशन सिस्टम मध्ये गुंतवणूक करतात तर तुम्ही निवृत्तीनंतर स्वताला आर्थिक स्वरुपात सुरक्षित करु शकतात. नॅशनल पेंशन सिस्टमअंतर्गत भारतातील नागरिक 18 वर्ष पासून 65 वर्षापर्यंत वयादरम्यान गुंतवणूक करु शकतात. एनपीएसच्या अंतर्गंत जमा होणाऱ्या फंड या बाबत निर्भर आहेत की तुम्ही किती रक्कम गुंतवणूक केली आहे आणि गुंतवणूक टर्म काय आहे. एनपीएसमध्ये गुंतवणूकीचे PFRDA च्या अप्रूव्ड पेंशन फंड मॅनेज करतात. याला PFRDA च्या इन्वेस्टमेंट गाइडलाइनच्या आधारे सेटअप केले जाते.

जर तुम्ही या एनपीएसचा भरपूर फायदा घेऊ इच्छित असाल तर त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर सुरुवात करावी लागेल. तुम्ही ऑनलाइन एपीएस कॅलक्युलेटरच्या मदतीने देखील गुंतवणूक आणि परतावा याची रक्कम माहिती करुन घेऊ शकतात.

असे बनतात 45.5 लाख रुपये –
एपीएस कॅलक्युलेटरनुसार, जर तुम्ही 30 वर्षाच्या वयात दरमाह 5 हजार रुपये गुंतवणूक करतात तर तुम्हाला परतावा म्हणून रिटायरमेंट नंतर महिन्याला 22,279 रुपये मिळतील आणि तुम्ही जवळपास 45.5 लाख रुपये खात्यात बनवू इच्छितात तर तुम्हाला गुंतवणूक थोडी वाढवावी लागेल.

10,000 रुपयांच्या गुंतवणूकीवर मिळतील इतके रुपये –
एनपीएस अंतर्गत तुम्ही 30 वर्षाच्या वयापासून दर महिन्याला 10,000 रुपये गुंतवू इच्छितात, तर तुम्हाला निवृत्तीनंतर 45,587 रुपये पेंशन आणि 91.1 लाख रुपये बनवाल. तुम्हाला यासाठी 10 टक्के व्याज दराने कॅलक्युलट केली गेलेली रक्कम आहे. याला 6 टक्के एन्युटी रेट च्या आधारे कॅलक्युलेट करण्यात आले आहे.

मिळेल करात लाभ –
नॅशनल पेमेंट सिस्टममध्ये करण्यात आलेल्या गुंतवणूकीनुसार तुम्हाला इनकम टॅक्स सेक्शन 80 सी अंतर्गंत 1.5 लाख रुपये सूट शिवाय अतिरिक्त 50,000 रुपये टॅक्समध्ये सूट मिळेल. एनपीएस टीयर 1 आणि टीयर 2 अंतर्गंत दोन प्रकारचे खाते सुरु केले जाऊ शकते. टीयर 1 खाते अनिवार्य असते तर टीयर 2 अंतर्गत खात्याचे पर्याय असतात. टीयर 1 खाते विड्रॉल प्रतिबंध असते, तर टीयर 2 खात्यासाठी सब्सक्रायबर कधीही गुंतवणूक केलेली रक्कम काढू शकतो.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like