केवळ OTP ने उघडा हे अकाऊंट, 60 वर्षाच्या वयात मिळवा 45 लाखांसह 22500 रुपये पेन्शन, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – जर तुम्हाला रिटायर्डमेंटनंतर एकमापी रक्कमेसह पेन्शन हवी असेल तर तुम्ही नॅशनल पेन्शन सिस्टम (एनपीएस) मध्ये गुंतवणूक करू शकता. एनपीएसमध्ये खाते उघडणे आता आणखी सोपे झाले आहे. तुम्ही घरबसल्या एक ओटीपीद्वारे एनपीएस खाते उघडू शकता. नुकतेच पीएफआरडीएने सबस्क्रायबर्सना वन टाइम पासवर्ड (ओटीपी) द्वारे सुद्धा एपीएस खाते उघडण्याची परवानगी दिली आहे. याअंतर्गत, बँकांचे ग्राहक ज्यांना आपल्या बँकेच्या इंटरनेट बँकिंग सुविधाद्वारे एनपीएस खाते उघडायचे आहे, ते आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी प्राप्त करून एनपीएस खाते उघडू शकतात. एनपीएसद्वारे तुम्ही 45 लख रुपयांसह 22,500 रुपये पेन्शन कशी मिळवू शकता, ते जाणून घेवूयात.

किती प्रकारची आहेत खाती
एनपीएसमध्ये 2 प्रकारची खाती उघडण्याची सुविधा मिळते. यामध्ये टियर-1 खाते पेन्शन खाते असते. तर, टियर-2 खाते वॉलंटियरी सेव्हिंग्ज खाते आहे. ज्या एनपीएस सबस्क्रायबरचे टियर-1 खाते आहे, ते टियर-2 खाते उघडू शकतात.

भारताचा कोणताही नागरिक ज्याचे वय 18 ते 65 वर्षाच्या दरम्यान आहे, काही महत्वाच्या प्रक्रिया पार पाडल्यानंतर या स्कीममध्ये सहभागी होऊ शकतात, एनपीएसमध्ये जमा रक्कम गुंतवणुक करण्याची जबाबदारी पीएफआरडीएद्वारे रजिस्टर्ड पेन्शन फंड मॅनेजर्सला दिली जाते. ते तुमची गुंतवणूक इक्विटी, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आणि नॉन गव्हर्नमेंट सिक्युरिटीजशिवाय फिक्स्ड इन्कम इंस्ट्रूमेंटमध्ये गुंतवतात.

एनपीएस कॅलक्युलेटर समजून घ्या
जर तुमचे वय 30 वर्ष आहे आणि तुम्ही 60 वर्षाच्या वयापर्यंत महिना 6 हजार रुपये एनपीएसमध्ये गुंतवणूक करता तर तुम्हाला 60 वर्षानंतर एकरकमी 45 लाख रुपये मिळू शकतात. 30 वर्षापर्यंत प्रत्येक महिन्याला 6 हजार रुपये गुंतवणूक केल्यानंतर तुमचे एकुण योगदान 21.6 लाख रुपये होते. अंदाजे 8 टक्के रिटर्नच्या हिशेबाने मॅच्युरिटीवर एकुण 90 लाख रुपये होतात. 50 टक्के एन्युटी खरेदी करावे लागेल. एन्युटीवर अंदाजे रिटर्न 6 टक्के. तुम्ही मॅच्युरिटी रक्कमेच्या 60 टक्के पैसे काढू शकता. ते टॅक्स फ्री असतील. 60 वर्षाच्या वयात प्रत्येक महिन्याला 22,500 रुपये पेन्शन मिळेल आणि एकरक्कमी 45 लाख रुपये.

एन्युटी तुमच्यात आणि इंश्युरन्स कंपनीत एक कॉन्ट्रॅक्ट असतो. या कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत नॅशनल पेन्शन सिस्टम योजनेत कमीतकमी 40 टक्के रक्कम एन्युटी खरेदी करणे जरूरी आहे. ही रक्कम जेवढी जास्त असेल, पेन्शनची रक्कम तेवढीच जास्त असेल. एन्युटी अंतर्गत गुंतवणूक केलेली रक्कम रिटायर्डमेंट नंतर पेन्शनच्या रूपात मिळते आणि एनपीएस योजनेची शिल्लक रक्कम एकमापी काढता येते.