Coronavirus : देशभरातून 50 वर्षापेक्षा अधिक वयाच्या ‘गुन्हेगारांना’ तुरुंगातून सुटका करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात ‘अपील’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   सुप्रीम कोर्टात 50 वर्षापेक्षा जास्त वयाच्या कैद्यांना पॅरोल किंवा अंतरिम जामीन देण्याचा विचार करण्याबाबत केंद्र व सर्व राज्यांना निर्देश मिळावे यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. सोमवारी अ‍ॅड.अमित सैनी यांनी दाखल केलेल्या याचिकेत मधुमेह, हाय बीपी आणि श्वसन समस्येने ग्रस्त कैद्यांना सोडण्यात यावे अशी मागणीही केली आहे.

सोमवारी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटले आहे की वृद्ध व्यक्ती आणि ज्यांना आधीच उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार आणि फुफ्फुसांचा गंभीर आजार आहे त्यांना कोरोना संक्रमणाचा धोका जास्त आहे.

अधिवक्ता अमित साहनी यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, तुरूंगात अत्यधिक गर्दीमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाचविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सरकारला यापूर्वीच उच्चस्तरीय समिती गठीत करण्यास सांगितले आहे. जे सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा असणारे गुन्हेगार आहेत अथवा अंडर ट्रायल आहेत त्यांना अंतरिम जामिनावर मुक्त केले पाहिजे असे या याचिकेत म्हटले आहे. साहनी म्हणतात की 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोरोनापासून अधिक धोका आहे. म्हणून त्यांना जामिनावर मुक्त केले पाहिजे.

उल्लेखनीय बाब म्हणजे 23 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना ही सूचना दिली. नुकतीच सर्वोच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल करण्यात आली असून, न्यायालयाने कैद्यांच्या सुटण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली. या याचिकेत म्हटले आहे की, सोडण्यात येणाऱ्या गुन्हेगारांना कर्फ्यू पास व्यतिरिक्त आर्थिक मदतही देण्यात यावी. ही याचिका सेंटर फॉर अकाउंटबिलिटी अँड सिस्टीमॅटिक चेंज (सीएएससी) ने दाखल केली होती.