PM मोदींनी स्टेजवरून दाबलं बटन, 6 कोटी शेतकरी कुटूंबांच्या अकाऊंटमध्ये जमा झाले 12 हजार कोटी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या कर्नाटक दौर्‍यावर आहेत. यावेळी, पंतप्रधान मोदींनी तुमकुरुतील श्री सिद्धगंगा मठाला भेट दिली. तुमकरूमध्येच त्यांनी शेतकऱ्यांच्या जाहीर सभेला संबोधित केले. मात्र, त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्टेजवरूनच बटण दाबत पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत तिसरा हप्ता शेतऱ्यांच्या खात्यावर पाठवून दिला. शेतकर्‍यांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या अंतर्गत ८ कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. इतक्या कमी वेळात ही कामगिरी साधणे ही मोठी गोष्ट आहे. ते म्हणाले की, आज या कार्यक्रमाद्वारे देशातील ६ कोटी शेतकरी कुटुंबांच्या खात्यात १२ हजार कोटी रुपये जमा झाले आहेत.

सर्व पैसे गरिबांच्या खात्यात
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशात एक काळ असा होता की जेव्हा गरिबांना एक रुपया पाठवला जायचा, तेव्हा केवळ १५ पैसे पोहोचायचे. उर्वरित ८५पैसे मधल्यामध्ये गायब व्हायचे. आज जेवढे पाठविले जात आहेत, ते सर्व थेट गोरगरीब आणि शेतकर्‍याच्या खात्यावर पोहोचत आहेत.

शेतकर्‍यांनी शेतात सौर ऊर्जा निर्मिती करावी
पंतप्रधान म्हणाले, राष्ट्रीय स्तरावर लसीकरण मोहीम सुरू केली गेली आहे, जेणेकरून शेतकर्‍यांना त्यांच्या प्राण्यांच्या आजारावर आणि उपचारावर कमीतकमी खर्च करावा लागेल. पीएम कुसुम योजनेने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सौर उर्जा निर्माण करून त्यांना राष्ट्रीय ग्रीडवर विकण्यासाठी सक्षम करण्यास सुरुवात केली आहे.

मच्छिमारांच्या सुरक्षेसाठी इस्रोची मदत
प्रचारसभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, मच्छीमारांना किसान क्रेडिट कार्ड सुविधेशी जोडले गेले आहे. त्यांच्या सोयीसाठी, मोठ्या नद्यांमध्ये आणि समुद्रात नवीन फिशिंग हार्बर बनवले जात आहेत. आधुनिक पायाभूत सुविधांसाठी साडेसात हजार कोटींचा विशेष निधीही तयार करण्यात आला आहे. मच्छीमारांच्या बोटींचे आधुनिकीकरण केले जात आहे आणि इस्रोच्या मदतीने मच्छीमारांच्या संरक्षणासाठी नौकांमध्ये नेव्हिगेशन साधने बसविली जात आहेत.

प्रत्येक घरात पाणीपुरवठा करण्याचा संकल्प करा
जलसंकटावर भाष्य करताना मोदी म्हणाले की, कर्नाटकसह भारतभरातील जलसंकटाच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सरकारने वॉटर लाइफ मिशन अंतर्गत प्रत्येक घरात पाणी देण्याचा संकल्प केला आहे. या मोहिमेअंतर्गत कर्नाटकसह देशातील ७ राज्यांमधील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत.

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/