PM नरेंद्र मोदींनी केले देशातील पहिल्या स्मार्ट औद्योगिक शहराचे उद्घाटन

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी औरंगाबाद औद्योगिक शहराचे (औरिक) उद्घाटन केले. हे देशातील पहिले नवीन स्मार्ट औद्योगिक शहर आहे जे १० हजार एकर क्षेत्रात पसरलेले आहे. हा दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल गॅलियरचा एक भाग आहे. यावेळी त्यांनी सहा मजली ऑरिक हॉलचे उद्घाटनही केले. ही इमारत स्मार्ट सिटीच्या देखरेखीसाठी व प्रशासनाचे केंद्र असेल.

यावेळी त्यांनी अत्याधुनिक संपर्क प्रक्रिया ऑरिक चॅटबॉट देखील सुरू केला, ज्यामुळे शहरातील कोणत्याही नागरिकाला त्यांच्या समस्या प्रशासनाकडून सोडवण्यास मदत होईल. महाराष्ट्राच्या मागासलेल्या मराठवाड्यात विकसित झालेल्या या शहराचे देशातील पहिले नवीन स्मार्ट औद्योगिक शहर म्हणून वर्णन केले जात आहे. हे दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल गॅलियर अंतर्गत विकसित केले गेले आहे. सरकार या प्रकल्पाच्या माध्यमातून देशातील दोन मोठ्या शहरांमधील औद्योगिक वाढीसाठी प्रयत्न करीत आहे.

औरंगाबाद येथे या कर्यक्रमाच्या उदघाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईहून आले होते. महिला स्वयंसेवक गटांनी तयार केलेल्या हस्तकलेच्या उत्पादनांच्या प्रदर्शनासही त्यांनी भेट दिली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यमंत्री पंकजा मुंडेही त्यांच्यासमवेत होते. पंतप्रधानांनी उज्ज्वला योजनेची आठ कोटीवी लाभार्थी आयशा शेख रफिक यांना एलपीजी कनेक्शनही दिले. त्यांनी काश्मीरच्या नर्गिस बेगमलाही एलपीजी कनेक्शन दिले. तिला काश्मीर खोऱ्यातून अधिकाऱ्यांनी येथे या समारंभासाठी आणले होते.

CM फडणवीस आणि पंकजा मुंडेंचे कौतुक
औरंगाबाद येथील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचे तोंडभरून कौतुक केले. मोदी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चांगलेच कौतुक केले. प्रधानमंत्री म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे एक यशस्वी मुख्यमंत्री आहेत.