मंत्री देखील परदेश दौरा करणार नाहीत, तुम्ही देखील अनावश्यक प्रवास टाळा : PM मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे जगभरात सतर्कता बाळगली जात आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करत सांगितले की COVID -19 नॉवेल कोरोना व्हायरसच्या परिस्थिती पाहून सरकार पूर्णपणे सतर्क आहे. सर्व मंत्रालयं आणि राज्य संपूर्ण सुरक्षेसाठी पावले उचलत आहेत.

यासाठी व्यापक पावलं उचलण्यात आली आहे. ज्यात विसा निलंबनपासून आरोग्य सेवांची क्षमता वाढवण्याचा देखील समावेश आहे. अशात घाबरण्याची कोणतीही आवश्यकता नाही. केंद्र मंत्री देखील परदेश यात्रेवर जाणार नाहीत. मी आपल्या देशवासियांनी आवाहन करतो की त्यांनी अनावश्यक यात्रा टाळावी. मोठ्या सभेत जाणे टाळा आणि सुरक्षित रहा.

कोरोना व्हायरसपासून वाचवण्याचे उपाय –
डब्ल्यूएचओ आणि अन्य संघटनांद्वारे कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी काही खास उपाय सांगितले आहेत. 6 वर्षांपेक्षा कमी आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांची काळजी घ्यावी.

भेटण्याची परंपरा बदलली –
फ्रांस सरकारने इंफेक्शनपासून वाचण्यासाठी भेटण्याची परंपरागत पद्धत (गालाचे चुंबन घेणे आणि हस्तांदोलन करणे) बदलली आहे. आरोग्य मंत्री ओलिवियर वेरन म्हणाले होते की भेटतावेळी दूरुन भेटावे. काही दिवसांपूर्वी जर्मनीचे मंत्री होस्र्ट जीहोफर द्वारे एँजेला मार्केल यांच्यासह हस्तांदोलनाचा व्हिडिओ बराच व्हायरल झाला होता.

व्यक्तीगत स्वच्छता ठेवा –
स्वच्छता राखा, आपले हात दिवसांतून अनेकदा धुवा. शिंकताना, खोकताना तोंडावर हात किंवा रुमा धरा. दिवसातून कमीत कमी 5 वेळा हात धुवा.

कोणत्या स्थितीत हात धुवावेत –
– आजारी व्यक्तीला भेटल्यानंतर
– शिंकल्यावर, खोकल्यावर
– बाहेरुन घरी गेल्यावर
– शौचालयाचा वापर करुन आल्यावर
– प्राणी, पक्षांना हात लावल्यानंतर
– जेवण तयार करण्यापूर्वी आणि जेवण करण्यापूर्वी

याची देखील घ्या काळजी –
– जर एखाद्या व्यक्ती तुमच्या जवळ शिंकतो किंवा खोकतो तेव्हा काही सेकंद थोडा थोडा श्वास घ्या.
– खोकताना किंवा शिंकताना टिशूचा वापर करा.

शिंकणाऱ्या आणि खोकलणाऱ्यांपासून दूर रहा. तसेच आपला तोंड झाकण्याचा प्रयत्न करा. ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे संशोधक एलिस्टेयर माइल्स यांच्या मते चेहऱ्याला सतत हात लावू नका. नाकाला तोंडाला सारखे हात लावणे योग्य नाही.

तर सिंगापूरच्या मेडिकल कॉलेजचे प्रोफेसर वांग ली फा यांचे म्हणणे आहे की लिफ्ट सर्वात घातक आहे कारण लिफ्टच्या बंद हवेत अनेक लोक श्वास घेत, सोडत असतात. सतत लिफ्टच्या बटणांना हात लावला जातो. त्यामुळे लिफ्टची बटण पेनाने दाबा. शौचालयाचा वापर करताना देखील काळजी घ्या.

युनिव्हर्सिटी ऑफ ग्रीफ्सवाल्डचे प्रोफेसर गुंटर काम्फ म्हणाले, दरवाजाचा उघडण्यासाठी त्याच्या हँडेंलला अनेक जण हात लावत असतात अशाने लवकर संसर्ग होतो. त्यामुळे दार उघडण्यासाठी दुसऱ्या एखाद्या वस्तुचा वापर केला गेला पाहिजे. आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे.

तुम्ही राहत असलेल्या खोलीचे तापमान 30 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त ठेवावे. यामुळे व्हायरसचे संक्रमण कमी होण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सह अनेक तज्ज्ञांनी सांगितले की उन्हाणे कोरोना व्हायरसचा प्रकोप कमी होऊ शकतो.