प्रजासत्ताक दिन 2020: PM नरेंद्र मोदी म्हणाले, ‘राजपथ’वर पूर्ण जग पाहणार आपली ‘शक्ती’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेणाऱ्या कलाकार आणि शाळेतील मुलांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, परेड मध्ये तुम्ही एक प्रकारे मिनी इंडिया-न्यू इंडिया पाहणार आहात. खऱ्या अर्थाने भारत काय आहे, हे आपल्या देशाला आणि पूर्ण जगाला आपल्याद्वारे समजते. भारताच्या श्रेष्ठतेची खरी ताकद त्याच्या भौगोलिक आणि सामाजिक विविधतेमध्ये आहे. आपला देश एक प्रकारे फुलांची माळ आहे, जिथे रंगीबेरंगी फुले भारतीयतेच्या धाग्याने विणली जातात.

तसेच त्यांनी म्हटले की जेव्हा आपण एक भारत, श्रेष्ठ भारत बद्दल बोलतो, तेव्हा आपल्याला हे देखील लक्षात ठेवावं लागणार आहे की भारत खऱ्या अर्थानं काय आहे. भारत फक्त सरहद्दींनी वेढलेला १३० कोटी लोकांचे घर असलेला देश नाही, तर भारत एक राष्ट्राबरोबर एक जिवंत परंपरा आहे, एक विचार आहे, एक संस्कार आहे, एक विस्तार आहे.

राजपथावर दिसणार भारताची शक्ती
‘अ‍ॅट होम’ कार्यक्रमात पंतप्रधान म्हणाले की, राजपथवरील तुमच्या कामगिरीमुळे संपूर्ण जग भारताची शक्ती पाहत असतो. भारताच्या ‘सॉफ्ट पॉवर’ च्या प्रसारामध्ये देखील याचा परिणाम होतो आणि यामुळे भारताच्या पर्यटन क्षेत्राला चालना मिळते.

परेडमध्ये भाग घेणाऱ्या तरुणांना पंतप्रधानांनी सांगितले की, येथे आलेल्या सर्व तरुणांना मी देशाविषयीच्या कर्तव्याबाबत जास्तीत जास्त चर्चा करण्यास उद्युक्त करतो. केवळ चर्चाच नाही तर स्वतःच याच्यावर अंमलबजावणी करून एक उदाहरण तयार करा. आपल्या अशाच प्रयत्नांतून नवीन भारत निर्माण होईल.

मोदींनी सांगितले गणतंत्र दिवस परेड मागील असणारे ध्येय
परेडच्या उद्देशाबद्दल पंतप्रधान म्हणाले, ‘आपण ज्या न्यू इंडियाच्या दिशेने वाटचाल करीत आहोत त्यामध्ये ही आकांक्षा व स्वप्ने आपल्याला पूर्ण करायची आहेत. भारतातील कोणताही माणूस, कोणताही प्रदेश मागे राहणार नाही. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमागील हेच मुख्य कारण आहे.

पंतप्रधान म्हणाले की जेव्हा एनसीसी आणि एनएसएसमार्फत शिस्त व सेवेची समृद्ध परंपरा राजपथवर दिसते तेव्हा देशातील कोट्यावधी तरुणांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळत असते.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like