महाराष्ट्रात आतापर्यंत पावसानं घेतले 47 बळी, कर्नाटकमध्ये स्थिती ‘गंभीर’, PM मोदींनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी केली चर्चा, मदतीचं ‘आश्वासन’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – जोरदार पाऊस आणि धरणांमधून पाणी सोडल्याने कर्नाटकच्या अनेक भागात शुक्रवारी पूरामुळे स्थिती गंभीर होती. तर महाराष्ट्रात पुणे, औरंगाबाद आणि कोकण विभागात मुसळधार पाऊस आणि पुरामुळे मागील तीन दिवसात 47 लोकांचा बळी गेला आहे. यामध्ये लाखो हेक्टर पिकाचे नुकसान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्याशी चर्चा केली आणि केंद्राकडून शक्य तेवढी मदत करण्याचे आश्वासन दिले.

हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवले
पश्चिम महाराष्ट्रात 28 लोकांचा मृत्यू पावसामुळे उद्भवलेल्या घटनांमध्ये झाला आहे. राज्याचा हा भाग पुणे विभागात येतो. मध्य महाराष्ट्राच्या औरंगाबाद विभागात 16 आणि कोकणात तीन लोकांचा मृत्यू झाला. पुणे विभागाीय आयुक्त कार्यालयाच्या माहितीनुसार, मुसळधार पाऊस आणि पूरामुळे 2300 पेक्षा जास्त घरांचे नुकसान झाले आहे. 21000 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. पुणे, सोलापुर, सातारा आणि सांगली जिल्ह्यात 57,000 हेक्टेयरमध्ये ऊस, सोयाबीन, भाजीपाला, धान्य, डाळिंब आणि कापसाच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.

महाराष्ट्राच्या चार जिल्ह्यात मोठे नुकसान
एका अधिकार्‍याने सांगितले की, सोलापुरमध्ये 14, सांगलीत 9, पुण्यात 4 आणि सातारा येथे एक व्यक्तीचा मृत्यू झाला. या चार जिल्ह्यात 513 जनावरांचा देखील मृत्यू झाला आणि 2319 घरांचे नुकसान झाले. सोलापुरमध्ये 17000, सांगलीत 1079, पुणे येथे 3000 आणि सातारा येथे 213 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. आपत्तीमुळे पश्चिम महाराष्ट्रात सोलापुर, सातारा, कोल्हापुर, सांगली, पुणे आणि मराठवाड्यात लातूर, उस्मानाबाद आणि बीड सर्वात जास्त प्रभावित आहे.

कर्नाटक आणि तेलंगणात मोठे नुकसान
कर्नाटक आणि तलंगणात मुसळधार पाऊस आणि पूरामुळे मोठे नुकसान झाले आहे. कर्नाटकचे उत्तर आणि उत्तर-पश्चिम क्षेत्रातील बागलकोट, बेल्लारी, बेलगावी, बीदर, धारवाड़, गदग, हावेरी, हुबली, कलबुरगी, कोप्पल, रायचूर, विजयपुरा आणि यादगीर सर्वात प्रभावीत आहे. पीएम मोदी यांनी मागील काही दिवसात तेलंगना आणि आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी चर्चा करून माहिती घेतली. तर तेलंगनाच्या हैद्राबादमध्ये अली नगर निवासी मुहम्मद अब्दुल ताहिरच्या कुटुंबातील पाच लोकांचे मृतदेह शुक्रवारी सापडले. या कुटुंबातील 9 लोक पुराच्या पाण्यात वाहून गेले होते.