केंद्राचा निर्णय ! 1 एप्रिलपासून सुरू होणार्‍या ‘जनगणना’ आणि ‘राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी’ला पुढील आदेशापर्यंत ‘स्थगिती’

वृत्तसंस्था – जनगणना 2021 आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीला (एनपीआर) केंद्र सरकारनं पुढील आदेशापर्यंत तुर्तास स्थगिती दिली आहे. याबाबतचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले आहेत. 1 एप्रिलपासून नोंदणी आणि जनगणना 2021 चा पहिला टप्पा सुरू होणार होता.


केंद्र सरकारनं उच्च स्तरावर चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक राज्य सरकारचा एनपीआरला विरोध होता. त्यामध्ये केरळ, पश्चिम बंगाल, पंजाब, राजस्थान, छत्तीसगड आणि बिहारचा समावेश आहे. दरम्यान, इतर राज्यांनी जनगणनेसाठी घरांची यादी करण्याच्या कामात सहकार्य करण्यात येईल असे सांगितले होते.