India Coronavirus News Updates : देशात 2 कोरोना वॅक्सीनची फेज-1 आणि फेज-2 ट्रायल : डॉ. वीके पॉल

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात कोरोना व्हायरसच्या स्थितीबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची पत्रकार परिषद झाली. यावेळी आरोग्य मंत्र्यांचे ओएसडी राजेश भूषण यांनी सांगितले की, भारतात आजसुद्धा 10 लाख लोकासंख्ये मागे कोरोना प्रकरणांची संख्या 837 आहेत, जी जगाच्या मोठ्या देशांच्या तुलनेत खुप कमी आहे, काही देश तर असे आहेत की भारताच्या तुलनेत प्रति 10 लाख लोकसंख्येवर 12 किंवा 13 पट प्रकरणे आहेत. 10 लाखांच्या लोकसंख्येत मृत्युदर 20.4 आहे, हा सुद्धा खुप कमी आहे. भारताची 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांत पॉझिटिव्हिटी रेट राष्ट्रीय पॉझिटिव्हिटी रेटच्या तुलनेत कमी आहे. देशात पॉझिटिव्हिटी रेट 8.07 टक्के आहे.

निती आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी म्हटले की, आपण कोरोना व्हायरस पीकवर येण्याची वाट पाहू नये. आपल्या स्तरावर काळजी घेतली पाहिजे, ज्यामुळे प्रकरणे वाढणार नाहीत. ऑक्सफॉर्ड आणि बुवान वॅक्सीनचे सुरूवातीचे परिणाम उत्साहजनक आहेत. देशात 2 कोरोना वॅक्सीन फेज-1, फेज-2 ट्रायलमध्ये आल्या आहेत.

डब्ल्यूएचओची गाईडलाइन सांगते की, 10 लाखांच्या लोकसंख्येवर 140 टेस्ट प्रतिदन झाल्या पाहिजेत भारतात सध्या 80 टेस्ट प्रतिदिन प्रत्येक 10 लाख लोकसंख्येमध्ये होत आहेत. भारतात सध्या 4,02,529 अ‍ॅक्टिव्ह केस आहेत आणि 7,24,577 लोक रिकव्हर झाले आहेत. भारतात केस फेटलिटी रेट 2.43 टक्के आहे, यामध्ये खुप मोठे योगदान डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफचे आहे. एम्सची सुद्धा महत्वपूर्ण भूमिका आहे. अनेक राज्यात मृत्यूदर राष्ट्रीय सरसरीच्या कमी आहे. आरोग्य मंत्रालयाचे सहकार्य राज्यांना मिळत आहे. वेळोवेळी आरोग्य मंत्रालयाची पथके राज्यांचा दौरा करत आहेत.

राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे संचालक डॉ. सुजीत कुमार सिंह यांनी म्हटले की, आम्ही सीरो सर्वे 27 जूनपासून 10 जुलैच्या दरम्यान दिल्लीत केला होता. हा सर्वे जूनच्या तिसर्‍या आठवड्या चित्र दर्शवतो. महामारीच्या सुमारे 6 महिन्यात 22.86 टक्के लोक प्रभावित झाले आहेत आणि 77 टक्के लोकसंख्या अतिसंवेदनशील आहे. दिल्लीची 77 टक्के लोकसंख्या सध्या सुरक्षित आहे, ज्यांच्यामध्ये संसर्ग होण्याची शक्यता आहे. यामध्ये ज्येष्ठांची संख्या जास्त आहे.

दिल्लीच्या 11 पैकी 8 जिल्ह्यात 20 टक्केपेक्षा जास्त सीरा संसर्ग आहे. मध्य, उत्तर-पूर्व, उत्तर आणि शाहदरा जिल्ह्यांमध्ये सुमारे 27 टक्के संसर्ग आहे. दिल्लीच्या स्थितीबाबत आम्ही चिंता करत नाही. आम्ही दिल्लीच्या स्थिती बाबत सध्या काही प्रमाणात समाधानी आहोत. एका लेव्हलनंतर व्हायरसचे संक्रमण कमी होत जाते. सीरो सर्वेला सध्या व्हायरसच्या संसर्गाच्या शक्यतेशी जोडून पाहूता येणार नाही.