पोस्टाच्या ‘या’ योजनेतील गुंतवणूक ‘खुप’च फायद्याची, दरमहा भरघोस व्याज, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल आणि अधिक परतावा मिळवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिसची एमआयएस (monthly income scheme) योजना अत्यंत उपयुक्त ठरेल. या योजनेत तुम्हाला दरमहा व्याज मिळेल, याची मॅच्युरिटी पाच वर्षांची असणार आहे. 1 जुलै पासून या योजनेच्या वार्षिक व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. आता या योजनेत 7.6 टक्के व्याज मिळणार आहे.

एमआयएम योजना
या मासिक उत्पन्न योजनेत तुम्ही एका खात्यात जास्तात जास्त 4.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करु शकतात, तर ज्वाइंट अकाऊंट असेल तर तुम्ही 9 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करु शकतात. ज्वाइंट खाते 2 किंवा 3 लोकांकडून वापरले जाऊ शकतात. याशिवाय सिंगल खाते ज्वाइंट खात्यात बदलता देखील येते.

रोख किंवा चेक द्वारे सुरु करु शकतात खाते
– हे खाते तुम्ही रोख किंवा चेक द्वारे देखील सुरु करु शकतात. चेक वसूल करण्याची जी तारीख असेल ती खाते सुरु करण्याची तारीख असेल.
– यासाठी खाते सुरु करण्यात आल्यानंतर देखील नामांकन प्रक्रिया करण्यात येऊ शकते. याशिवाय हे खाते एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये हस्तांतरण देखील करण्यात येते.
– कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये कोणतेही खाते सुरु करण्याची मान्यता देण्यात आली असली तरी सर्व खात्यांवरील उर्वरित रक्कमेला जोडून जास्तीत जास्त गुंतवणूक करण्यावर निर्बंध आणण्यात आले आहे.
– अल्पवयीन म्हणजेच पालक आपल्या मुलांच्या नावे देखील हे खाते सुरु करु शकतात. यासाठी किमान 10 वर्ष वयाची अट आहे. हे खाते नावावर असलेला मुलगा किंवा मुलगी कोणीही स्वत: हाताळू शकते.

पैसे काढण्यासाठी ही आहे अट
कोणत्याही विशेष प्रसंगी तुम्ही या खात्यातून पैसे काढून वापरु शकतात. परंतू यातून काही रक्कम कापण्यात येईल. खात्यातून तुम्ही एक ते तीन वर्षातच जमा रक्कम काढल्यास तुम्हाला 2 टक्के कापून देण्यात येईल. जर तुम्ही 3 वर्षानंतर मॅच्युरिटीनंतर कधीही पैसे काढलेत तर त्यातील 1 टक्के रक्कम कापून देण्यात येईल.

आरोग्यविषयक वृत्त